आषाढी एकादशीच्या दिवशी जालना - पंढरपुर प्रवासी एसटी बसच्या धडकेच दोन युवकांचा मृत्यू झाला (फोटो - सोशल मीडिया)
कुर्डुवाडी : पंढरपूरच्या रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. आषाढी एकादशीनिमित्त जालना ते पंढरपुर असे प्रवासी घेऊन येणाऱ्या जालना जिल्ह्यातील एरंडोल आगाराच्या एस टी बसला समोरून भरधाव वेगात येणारी मोटारसायकल जोरात धडकली. या धडकेत मोटार सायकलवरील दोघेजण गंभीर जखमी झाले होते. मात्र दोन युवकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
होऊन उपचारापूर्वीच मयत झाले. अपघाताची घटना एकादशीच्या रात्री दि. ६ रोजी कुर्डुवाडी – पंढरपुर रस्त्यावरील लऊळ शिवारात रा.९.५० वा सुमारास घडली. सुरेश बाळासाहेब पाटील (वय २३), शिवाजी बापूसाहेब दळवी (वय २१) दोघे रा. उजनी ता.माढा जि.सोलापुर अशी अपघातातील मयत तरुणांची नावे आहेत. दोन तरुण गाडी चालवताना बसच्या पुढच्या भागाला धडकले. यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी दोन तरुण मुलांचा जीव गेल्याने कुर्डुवाडीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आषाढी एकादशीनिमित्त जालना – पंढरपुर (एम एच २० बी एल ३१७३) प्रवासी बस घेऊन चालली होती. या बसमध्ये चालक रमेश पांडुरंग पाटील व वाहक सुनील सुरेश पाटील हे पंढरपुरच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये होते. ही एस टी बस कुर्डुवाडी – पंढरपुर रोडवरील लऊळ गावच्या शिवारात आली असता रात्रीच्या ९.५० वाजण्याच्या सुमारास मोटारसायक एम एच ४५ ए आर ६५३६) वरुन डबलसीट कुर्डुवाडीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या मोटारसायकल स्वाराने हयगयीने व राँग साइडने येत होता. एस टी बसला समोरून मध्यभागी जोराची धडक दिली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या अपघातात मोटारसायकलवरील दोघे तरुण उडून रस्त्यावर पडले व त्यांच्या डोक्यातून रक्त येऊन ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते. अपघातस्थळी लोकांची गर्दी जमू लागल्याने लोक मारतील या भीतीने एस टी चालक व वाहकाने तेथून थेट पोलिस स्टेशन गाठले. त्यानंतर फिर्यादी चालकाला जखमी झालेले मोटारसायकलवरील दोन्ही तरुण हे उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे समजले. याबाबत एस टी बस चालक रमेश पांडुरंग पाटील रा. कन्हेरे जि.जळगाव यांच्या फिर्यादीवरुन मयत मोटारसायकलचालक शिवाजी बापूसाहेब दळवी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.