वसमतमध्ये सर्वेक्षण करण्यात आले असून अनेक समस्या असल्याचे समोर आले (फोटो - सोशल मीडिया)
वसमत : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वसमत शहरात विकासाचे फुगवलेले दावे धुळीस मिळत आहेत. नवराष्ट्रच्या विशेष तपासातून समोर आलेली तथ्ये गंभीर आहेत. लोकप्रतिनिधींच्या भाषणात विकासाचा हल्ला असला, तरी प्रत्यक्षात शहराचा “विकास” हा फक्त कागदावर आणि कंत्राटदारांच्या आर्थिक वाढीत दिसून येतो. वसमत शहराची स्थिती विकासाच्या नावाखालील आर्थिक लुटीचे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिक म्हणत आहेत.
नगरपालिकेने मागील तीन वर्षांत रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर केली. कंत्राटे दिली गेली. बिलंही पास झाली. पण शहरात आज अशी एकही मुख्य गल्ली नाही जिथे खड्ड्याशिवाय रस्ता दिसतो. एक नागरिक म्हणतो “रस्ते बनले की खड्डे भरायला, की खड्डे बनले रस्त्याला ? समजेनासे झाले आहे.” असे वसमतकऱ्यांचे स्पष्ट मत आहे. ज्या शहरात विकास झाला नाही, त्या शहरात विकासाची भाषा ही नागरिकांचा अपमान आहे. निवडणूक काही दिवसांवर आली असली, तरी शहर आजही प्रश्नांनी वेढलेले आहे आणि उत्तर देणारा कोणी नाही.
नवनीत राणा पुन्हा कडाडल्या! धर्म अन् अयोध्येवर टीका करणाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
शहर अंधारात आणि पाण्यावाचून पाणीपुरवठा
पाणीपुरवठाः कोटीची पाइपलाइन, पण नळातून ‘हवा’ पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात आलेल्या नव्या पाइपलाइनची किमत कोट्यवधींमध्ये, पण तांत्रिक क्षमतेचा पूर्ण अभाव. तपासात दिसून आले की ज्या भागात पाइपलाइन टाकली गेली, तिथल्या बहुतांश वाल्व्ह कार्यरतच नाहीत. पाणी पुरवठ्याची कोणतीही मॉनिटरींग प्रणाली नाही. ८-८ दिवस नळ कोरडे आणि तरीही कंत्राटदारांचे बिल १०० टक्के पास एका महिला रहिवाशाचे वक्त्तव्यः “नळावर येणा-या पाण्यापेक्षा राजकारण्यांच्या भाषणातला पाण्याचा आवाज जास्त.”
अंधारः लाईटसाठी कोट्यवधी, तरीही वसमत काळोखात प्रकाश योजनेसाठी कोटींचे प्रकल्प मंजूर. पण प्रत्यक्षात शहरातील ४०- ५० टक्के रस्त्यांवर स्ट्रीटलाइट कार्यरत नाहीत. काही भागात पोल बसवले, पण कनेक्शनच नाही. काहींमध्ये खांब उभे, पण दिवे गायब आहे. स्थानिक तरुणाचा टोला लाईटपेक्षा बिलिंगची व्यवस्था जास्त स्मार्ट आहे इथे असा टोला लगावला आहे.
बंद दाराआड सापडल्या पैशांनी खचाखच भरलेल्या बॅगा; निलेश राणेंनी भाजप नेत्याच्या घरी टाकली धाड
स्वच्छता: दरमहा ३५ लाखांचा खर्च तरीही वसमत कचरा डेपो नगरपालिकेच्या कागदांनुसार स्वच्छतेसाठी दरमहा तब्बल ४० लाख रुपये खर्च केले जातात. पण प्रत्यक्षात तपासात आढळले घंटागाडी वेळेवर फिरतच नाही. उचललेला कचरा डंप करण्याची व्यवस्थित जागा नाही.
सर्वेक्षण
आमच्या सर्वेक्षणात ७३ टक्के नागरिकांनी स्पष्टपणे म्हटले “या नगरपालिकेने विकास केला नाही, तर विकासाच्या पैशाचा विनियोग केला. पक्षीय सभांमध्ये विकासाच्या घोषणा धडाक्यात, पण नागरिकांचे प्रश्न थेट रस्ते कुठे गेले?, पाणी कुठे गेले?, लाईट कुठे गेले?, आणि कोट्यवधी रुपये कुठे गेले नागरिकांचा थेट इशारा ‘विकास’ हा मुद्दा बोलायलाच नकोच.






