सध्या देशभरात महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) चांगलच चर्चेत आहे. राज्यात अतिशय वेगानं राजकीय घडामोडी घडताहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी 30 पेक्षा अधिक आमदारांना सोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यावरूनच विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. आधी पक्षातील लोकं फुटायचे आता पक्ष पळवला जातोय, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
[read_also content=”कर्नाटकात जैन मुनी कमकुमार नंदी महाराज यांची हत्या, बुधवारपासून होते बेपत्ता; मृतदेहाचे तुकडे करुन फेकले! https://www.navarashtra.com/crime/jain-muni-murdered-in-karnataka-accused-say-the-body-was-cut-into-pieces-and-thrown-away-nrps-429362.html”]
उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी यवतमाळ येथे त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याची राजकीय परिस्थिती जशी दिसतेय तशी पाहतोय. सध्या फोडफोडीच राजकारणात सुरू आहे. मात्र, हे अशा पद्धतीने राजकारणात फोडाफोडी होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. पण यापूर्वी पक्ष फोडला जात होता, मात्र आता पक्ष पळवला जात आहे. विशेष म्हणजे, पक्ष पळवल्यानंतर सुद्धा आम्हाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत माझ्या ज्या काही सभा झाल्या, तसेच इथे येताना रस्त्यात जागोजागी लोकं थांबलेली होती. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर लोकं येऊन सांगत आहे की, जे काही घडतंय ते वाईट आहे. ही परंपरा, पायंडा महाराष्ट्रासाठी वाईट आहे. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत असल्याचे लोकं सांगत, असल्याचं ठाकरे म्हणाले.