'रुसू बाई रुसू गावी जाऊन बसू'; एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंचा टोला
एकनाथ शिंदे यांचे ‘रुसू बाई, रुसू’ या बालगीताप्रमाणे हाल सुरू आहेत. अडीच वर्ष एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून वागणूक मिळत होती. पण आता त्यांना वेगळी वागणूक मिळत आहे. काही मानासारखं झालं नाही तर ते बालगीताप्रमाणे’ रुसू बाई रुसू’, कोपऱ्यात जाऊन बसून असं करत आहेत. आता बसत असाल तर बसा नाहीतर रुसून गावी निघून जा, असं सांगितलं जात आहे. हवं ते मंत्रिपद मिळत नाही तर रुसून गावी जा. दावोसला नेलं , खुर्चीच्या बाजुला बसवलं नाही रुसून ते लगेच गावी जातात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रातील विजय हा उद्धव ठाकरेंना जागा दाखवणारा आहे, असं अमित शहा म्हणालेत. पण त्या अमित शहांना जखमी वाघ काय असतो आणि त्यांचा पंजा काय असतो हे पुढील भविष्यात दिसेल. मराठी माणसांच्या नादी लागू नका. जेथे औरंगजेबला झुकवलं तेथे अमित शहा किस झाड की पत्ती है, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर हल्लाबोल केला.
गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना संपवूनच उद्धव ठाकरे संपेन. पण ज्यावेळी माझा एक शिवसैनिक उठून म्हणेल की, उद्धव ठाकरे तुम्ही हिंदूत्व विसराला आहात त्यावेळी मी मुख्यमंत्री पद सोडलं तसं मी पक्ष प्रमुख पद सोडेल. मला खात्री आहे, ज्या पद्धतीने महाराष्ट्र मला त्यांच्या कुटुंबातील एक मानतो ते इतक्या निष्ठूरपणे वागू शकत नाही,असं ठाकरे म्हणाले.
”गद्दाराने वार केलं तर उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी बसेन. पण ज्या दिवशी माझा एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलला की उद्धव तू बाळासाहेबांचे विचार सोडले आहेस, तू बाजूला हो. त्या क्षणी जसं मी मुख्यमंत्रिपद सोडलं तसं मी प्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही. मला खात्री आहे, की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांच्या परिवारातील एक सदस्य मानतो, मला त्यांचा कुटुंब प्रमख मानतो. तो माझा महाराष्ट्र तो माझा मुंबईकर एवढा निष्ठूरपणे एवढा निर्दयपणे जीवाला जीव देणाऱ्या शिवसेनेशी वागू शकत नाही.” असं उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात म्हटलं आहे.
मराठी माणसाच्या नादी लागू नका, जिथे औरंगजेबाला या महाराष्ट्राने झुकवलं तिथे अमित शाह किस झाड की पत्ती? मी मुद्दाम जाहीर सभा घेतली. कारण म्हटलं कळू तरी द्या की माझ्याबरोबर किती लोक राहिले आहेत? अमित शाह तुम्ही माझी जागा ठरवू शकत नाही. कारण माझी जागा ठरवणारी बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली ही माझी शिवसैनिकांची संपत्ती आहे. जे शिवसेनाप्रमुख बोलायचे की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक तोपर्यंत शिवसेनाप्रमुख आहे, तेच मी सांगतो आहे जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मी तुमचा पक्ष प्रमुख आहे. गद्दारांनी वार केले तर हा उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी केली.