मुंबई : शिंदे गटाने बंड केल्यानंतर पहिल्यांदाच दसरा मेळावा होत आहे. दरम्यान, अनेकवेळा विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत राडा घालत आहेत, तसेच शिंदे गट व शिवसैनिक (Shivsainik) यांच्यात सुद्धा राडे होताना दिसत आहेत. दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट व उद्धव ठाकरेंची शिवसेनेला (Shivsena) कोर्टाची (Court) पायरी चढावी लागली. यानंतर शिवसेनेला दसरा मेळावा साजरा करण्याची परवानगी कोर्टानी दिली आहे. परंतू दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) आरोप-प्रत्यारोप, टिका, टिपण्णी होत आहे. यावर राजकारण होताना दिसत आहे.
[read_also content=”विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडून शिवाजी पार्क मैदानाची पाहणी https://www.navarashtra.com/maharashtra/vishwas-nangre-patil-look-at-shivaji-park-ground-332415.html”]
दरम्यान, शिवाजी पार्कवर आता (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा होणार आहे. यावर केंद्रीयमंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) तुम्ही दसरा मेळाव्याला तुम्ही जाणार का? असा प्रश्न विचारला असता, यावर राणेंनी गंमतशीर उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जर मला आमंत्रण दिलं तर मी दसरा मेळाव्याला जाईन. पण उद्धव ठाकरे हे मला आमंत्रण देणार नाहीत हे माहिती आहे, असं मिश्किल उत्तर नारायण राणे यांनी दिलं. तसेच एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आमंत्रण दिलं तर मी जरूर जाईन असं सुद्धा राणे म्हणाले.