Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ujani Dam : उजनी धरण 100 टक्के भरले; भिमा नदीत 31600 क्यूसेकने विसर्ग

उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आनंदाचे वातावरण असले, तरी वाढता विसर्ग लक्षात घेता नदीकाठच्या सर्व नागरिकांनी अत्यंत दक्षता बाळगणे आवश्यक आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 28, 2026 | 07:36 AM
उजनी धरण 100 % भरले

उजनी धरण 100 % भरले

Follow Us
Follow Us:

कुर्डुवाडी / हर्षल बागल : सोलापूर जिल्ह्याची भाग्यविधात्री मानले जाणारे उजनी धरण काही वेळापूर्वीच 100 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक कायम असून, धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भीमा नदीत विसर्ग सुरू आहे.

सध्या उजनी धरणाच्या सांडव्यावरून 30000 क्यूसेक आणि जलविद्युत केंद्रातून 1600 क्यूसेक असा एकूण 31600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात करण्यात येत आहे. दरम्यान, दौंड येथून तब्बल 65000 क्यूसेक वेगाने पाण्याची आवक धरणात सुरू असल्याने पुढील काही तासांत विसर्गात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

रात्री साडेदहा वाजता 40 हजार क्यूसेक विसर्ग

उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 10:30 वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरील विसर्ग वाढवून 40,000 क्यूसेक करण्यात येणार आहे. पाण्याच्या आवकेनुसार, या विसर्गात आणखी वाढ किंवा आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

पूरस्थिती लक्षात घेता भीमा नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, जनावरे, शेती साहित्य व इतर वस्तू तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. तसेच सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

देशातील काही राज्यात मुसळधार तर काही राज्यात तुरळक पाऊस; उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड, सिद्धार्थनगरमध्ये हवामान विभागाचा अलर्ट

अत्यंत दक्षता बाळगणे आवश्यक

उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आनंदाचे वातावरण असले, तरी वाढता विसर्ग लक्षात घेता नदीकाठच्या सर्व नागरिकांनी अत्यंत दक्षता बाळगणे आवश्यक आहे.

पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस

दुसरीकडे, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी (ता. २७) दुपारच्या सुमारास पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने दमदार पुनरागमन केले. अवघ्या दोन-तीन तासांच्या जोरदार सरींमुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले, तर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. काही सखल भागांत पाणी साचल्याने आणि काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.

Nashik News : त्र्यंबकरोडचे दळणवळण की नरकयातना? आयटीआय सिग्नलवर किलोमीटरभर रांगा, तासनतास कोंडी अन् वाहतुकीचा बोजवारा

Web Title: Ujani dam filled to 100 capacity discharge into bhima river at 31600 cusecs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 07:36 AM

Topics:  

  • Rain News
  • Ujani Dam
  • Water Issue

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
2

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

पश्चिमेला पाऊस, पूर्वेला दुष्काळ; जुन्नरच्या पूर्व भागाला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
3

पश्चिमेला पाऊस, पूर्वेला दुष्काळ; जुन्नरच्या पूर्व भागाला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Bhimashankar Rain: भीमाशंकर परिसरात अतिवृष्टीचा तडाखा! दरड कोसळल्याने दोन प्रमुख मार्ग बंद
4

Bhimashankar Rain: भीमाशंकर परिसरात अतिवृष्टीचा तडाखा! दरड कोसळल्याने दोन प्रमुख मार्ग बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.