उजनी धरण 100 टक्के भरणार; वीजनिर्मिती प्रकल्पच केला गेला बंद
टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असल्याने अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण अवलंबून असलेले उजनी धरण जुलै महिन्याच्या सुरूवातीला जलद गतीने १०० टक्के भरणार होते. मात्र, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पूरस्थिती टाळण्यासाठी उजनीतून आत्तापर्यंत ६४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरण ७ जुलै रोजीच १०० टक्के भरले असते.
आज अखेर उजनीतून तीन वेळा पूरनियंत्रणासाठी पाणी सोडले होते. शनिवारी सायंकाळी सहा वाजता उजनी धरण ९९.७८ टक्के ११७.१८ टीएमसी झाले आहे. तर दौंड येथून ३१०२ क्युसेक विसर्ग उजनीत येत आहे. त्यामुळे उजनी मध्यरात्री शंभरीचा पल्ला गाठणार आहे. आज मध्यरात्रीपर्यंत उजनी १०० टक्के भरणार आहे. उजनी धरणाने निर्मितीपासून ४५ वर्षात आत्तापर्यंत ३७ व्या वेळा १०० टक्के भरले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या बरोबर उद्योग धंदे, कारखानदार व उजनीवर पिण्याचे पाणी अवलंबून असणाऱ्या सोलापूरसह छोट्या-मोठ्या शहरांतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाळा सुरू झाला की, शेतकरी, व्यापारी आणि कारखानदार यांचे उजनी धरणांच्या वाढत्या पाणी साठ्याकडे लक्ष असते. कारण, उजनी शंभरी टक्के भरले तर अर्थकारण फिरते. चालू वर्षी मे महिन्यातच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनीत झपाट्याने पाणीसाठा वाढला होता. उजनी धरणात दौंड येथून मोठा विसर्ग येऊन पाणीसाठा वाढून धरणाची पाणीपातळी समाधानकारक झाली आहे.
शनिवारी ३१०२ क्युसेक
शनिवारी सायंकाळी ३१०२ क्युसेक झाला आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. उजनी आज १०० टक्के भरणार असून, पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी ६ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
७० दिवसात उजनी धरणात १०० टक्के पाणी
गेल्या ७० दिवसात उजनी धरणात १०० टक्के पाणी आले आहे. आता उजनी धरणात ११७.११ टीएमसी असून, त्यातील ५३.४६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. उजनी १०० टक्के भरण्यासाठी आणखी ०.२२ टक्के पाण्याची गरज आहे. उजनीवरील १९ धरणांपैकी केवळ एका ही धरणाचा पाणीसाठा अल्प आहे. सर्व धरणे १०० च्या जवळ आली आहेत. त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तर तो उजनी धरणात येणार आहे.