वाहतूक कोंडीने गाठली परिसीमा! रुग्णालय गाठण्याआधीच रिक्षेत महिलेची प्रसूती
मात्र, या घटनेमुळे उल्हासनगर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महापालिका असलेल्या शहरात नागरिकांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा इतका मोठा त्रास सहन करावा लागत असेल, तर शहरातील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
एकीकडे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि आपापसातील वाद सुरू आहेत; मात्र दुसरीकडे सामान्य नागरिकांना रस्त्यावर मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. आपापसात भांडणाऱ्या राजकारण्यांनी आता राजकीय वाद बाजूला ठेवून शहराची ही अवस्था पाहावी आणि नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
उल्हासनगर शहरात वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येमुळे एका महिलेला रुग्णालयात वेळेत पोहोचणे अशक्य झाल्याने या महिलेला रिक्षामध्येच आपल्या बाळाला जन्म द्यावा लागला. उल्हासनगरमधील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढती वाहतूक कोंडी सर्वसामान्यांच्या जीवावर कशी बेतत आहे, याचे हे एक विदारक उदाहरण आहे.
या घटनेचा स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सुदैवाने, प्रसूतीनंतर माता आणि बाळ दोघेही सुरक्षित असल्याचे समजते आहे.
रुग्णवाहिकेच्या चालकांनी रुग्णालयात धाव घेतली , डॉक्टर आणि नर्स यांना माहिती दिली.घटनेचे गांभीर्य ओळखून
डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांनी गरोदर महिलेची परिस्थिती बघून रिक्षातच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. ही
घटना गुरवारी पहाटे साडे तीन वाजताची आहे.
रुग्णालयातील महिला इंटन डॉक्टर, परिचारिका लागलीच तत्परता दाखवून सदर महिलेची प्रसुती रिक्षात यशस्वी झाली.रिक्षातील त्या महिलेने बाळास जन्म दिला. यावेळी रुग्णालयाचे वार्डबॉय धीरज सितापारा आणि खाजगी अॅम्बुलन्स चालक विशाल शेलार यांनी त्या महिलेस प्रसूती वॉर्ड पर्यंत स्ट्रेचरवरून घेऊन गेले. महिला व बाळाची तब्येत ठणठणीत असल्याचीमाहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.
Ans: वाहतूक कोंडीत रिक्षा अडकल्यानंतर महिलेची रिक्षामध्येच प्रसूती झाली.
Ans: डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत रिक्षातच प्रसूती करण्यास मदत केली आणि त्यानंतर महिला व बाळाला प्रसूती वॉर्डमध्ये नेण्यात आले.






