'विकासाला अधिक गती देणारा अर्थसंकल्प,' सुधीर मुनगंटीवारांची अर्थसंकल्पावर प्रतीक्रिया (फोटो सौजन्य-ट्विटर)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्पावर आता राजकीय स्तरातून प्रतिक्रीया येत आहे. याचपार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विकासाला अधिक गती देणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. तसेच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला. या अर्थसंकल्पामुळे खते व बी-बियाणे स्वस्त होतील. हा अर्थसंकल्प शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याच्या दिशेने अधिक दमदार पाऊल टाकणारा आहे. तेलबियांच्या उत्पादनाला दिलेल्या सवलती व चालना दिल्यामुळे देश खाद्यतेल क्षेत्रात स्वयंपूर्ण बनेल असा विश्वास वाटतो. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याकरता ग्रामपंचायत पातळीवर दिलेल्या योजना व सवलती हे आपली जमीन, जल व धान्य निर्वीष करणाऱ्या आहेत, असे ते म्हणाले.
आजच्या अर्थसंकल्पात हवाई वाहतूक व जल वाहतुकीला तसेच जहाज व विमान दुरूस्ती व देखभाल या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरता जाहीर केलेल्या योजना देशाला या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवत पुढे नेणाऱ्या आहेत. ग्रामीण आणि नागरी भागातील भूमी अभिलेखांचे डिजिटायजेशन तसेच नवीन सर्वेक्षण, त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यातून जमिनीचा वापर अधिक कार्यक्षमतेने करता येईल, तसेच विकासाचे नियोजन नियंत्रण करणाऱ्या संस्थांना व प्राधिकरणांना अधिक चांगले काम करता येईल, असेही ते म्हणाले. भूमी अभिलेख क्षेत्रात बरेच दिवस प्रलंबित असलेले प्रश्न या अर्थसंकल्पामुळे सुटतील. असेही मुनगंटीवार म्हणाले. सर्वसामान्यांना आयकरात सवलत देतांनाच कॉर्पोरेट क्षेत्रालाही सवलती दिल्या आहेत, त्या सवलती रोजगार निर्मितीशी जोडल्याने (एम्प्लॉयमेंट बेस्ड इंसेंटीव्हज) कंपन्यांना तंत्रज्ञान व नफा यासोबतच आता रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागणार आहे, त्याचे स्वागत केले पाहिजे, असे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील जमीनी मोजण्याकरीता जीएसआय प्रणालीचा उपयोग तसेच शहरी भागातील जमीन खरेदी विक्री व्यवहारांचे डिजीटलायझेशन करण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनाचे आपण स्वागत करीत असून, राष्ट्रीय सहकार धोरणातून कृषि, सहकारी संस्थाना पाठबळ देण्याची भूमिका या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा दिसून आल्याने केंद्र सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश या अर्थसंकल्पातून मिळाला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले.
माझ्या मते आजचा अर्थसंकल्प हा बऱ्याच इंडस्ट्रीला आणि देशाला फायद्याचा ठरणार आहे. आजच्या अर्थसंकल्पाचा इंडस्ट्रीला आणि हाऊसिंग ला खूप मोठा फायदा होणार आहे. ई-कॉमर्स एक्सपर्ट बद्दल बोलण्याची गरजच नाही. माझ्या दृष्टीने आजच्या अर्थसंकल्पाचा खूप युवकांसाठी जास्त फायदेशीर ठरणारा आहे.
आजचं बजेट हे युवकांपासुन सर्वसामान्य व्यक्तीपर्यंतच बजेट होतं , शेतकरी, उद्योजकांचं बजेट होतं उद्योग नगरी देशभरात करण्याचा निर्णय देखील केंद्रसरकारने घेतला आहे. तीन महिन्यापुर्वी महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाकडे प्रेझेंन्टटेशन केंद्रसरकारने मागवलेलं होत. आणि तशीच्या तशी योजना देशभरामध्ये लागू केली जाते. याच अर्थ उद्योग विभाग अतिशय व्यवस्थित दिशेने काम करतय यांच्यावर केंद्रशासनाने देखील शिक्का मोर्हब केलेला आहे. महाराष्ट्रासाठी देखील अनेक उपाययोजना या अर्थसंकल्पामधून केलेल्या आहेत. हे देशाचं बजेट आहे आणि त्यात महाराष्ट्र नक्कीच आहे
आज सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाचा नसुन दोन राज्यांचा होता. ग्रामीण अर्थव्यवस्थेतेसाठी काही ठोस उपाय योजना नाहीत , मनरेगा मधून रोजगार मिळू शकतो. सादर केलेल्या अर्थ संकल्पातून शेतकऱ्यांच्या हाती काही नाही. यात आर्थिक विषमता कमी करण्यासारखं काही नाही. तसेच जे मध्यमवर्गीय भाजपला मतदान करतात, त्याच्यासाठी काही नव्हतं. महागाई कमी होण्यासारखं काय नाही, हे बजेट सरकार वाचवण्याकरिता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दावा केला होता महाराष्ट्राच्या विकासासाठी ते मोदीं सोबत गेले. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्याचं उत्तर मिळेल
सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर झाला. खऱ्या अर्थाने सर्व घटकाला न्याय देईल अशा प्रकारचा अर्थ संकल्प आहे. विरोधकांचा कायमच एक नेरेटिव्ह तयार असतो महाराष्ट्राला काय मिळाले ? दहा वर्षे कॉंग्रेसची मनमोहनसिंग यांची सरकार असताना जे दिले त्यापेक्षा दहापट महाराष्ट्राला मोदी सरकार आल्यानंतर दिले गेले आहे. कृषी प्रधान अर्थसंकल्प मोदी सरकारचा असतोच. या अर्थसंकल्पात भरीव असे काम केल्यानंतर निश्चितच मला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. भारत देश जगात एक नंबरला येईल, असा विश्वास वाटतो, अशी प्रतिक्रीया संजय केळकर यांनी दिली.