बीड : बीड जिल्ह्यातील परळी येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने महावीतरणाच्या निषेधात तिरडी आंदोलन करण्यात आले. परळी शहराची स्थिती सध्या धरण उशाला कोरड घशाला अशी स्थिती झाली आहे. थर्मल पॉवर स्टेशन असणाऱ्या ठिकाणी लोडशेडिंग होणार नाही, असे असतानाही परळीत रात्री बेरात्री, सकाळ, दुपार, संध्याकाळ केव्हाही लाईट जात आहे. कडक उन्हाळा असल्यामुळे वयोवृद्ध, लहान मुले गर्मी मुळे त्रस्त आहेत. आधीच पिण्याचे पाणी तब्बल पाच दिवसाला येत आहे त्यात लाईट नसल्यास पाणीही मिळत नाही.
राज्यत सुरू केलेले अघोषित भारनियमयाविरुद्ध आता भाजप आक्रमक झालेले दिसून येत आहे.भाजपा लोकनेत्या तथा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या आदेशानुसार भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने परळी येथील महावितरण कार्यालयावर आज विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक बंद फॅन ची तिरडी बाजार समिती मोंढा येथून व्यापार पेठ, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथून महावितरण कार्यलयापर्यंत काढण्यात आली. यावेळी महावितरण च्या गलथान कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. भर उन्हाळ्यात सुरू केलेले भारनियमन तात्काळ बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विशेष बाब म्हणजे राज्यात असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रापैकी 750 मॅगाव्हेट चे प्रकल्प आहेत. या प्रकल्पामुळे होणारे राखेचे प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम परळी परिसरातले नागरिक भोगत आले आहेत. असे असतानाही परळी परिसरात होणारे भारनियमन दुर्दैवी आहे. त्याच बरोवर आता अंतिम सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत,सततचे अनियमित होणारे भारनियमन विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे असून या भारनियमनाविरुद्ध आता परळी भाजप आक्रमक झालेले दिसून येत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजेच प्रभू वैद्यनाथाचे परळीत मंदिर आहे. येथे दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात असे असतानाही भरनियमन करणे चुकीचे आहे असेही या आंदोलनात म्हटले आहे.
लाईट जाण्याचे कुठलेही ठरलेले वेळापत्रक नसल्यामुळे शहरात सध्या गोंधळ उडाला आहे. या लोडशेडिंग विरोधात आज भाजयुमो, भारतीय जनता पक्षातर्फे पंख्याची प्रतिकात्मक तिरडी काढून तीव्र आंदोलन करण्यात आले. लवकरच यावर तोडगा जर काढला नाही तर भाजपा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी कार्यकर्त्यामार्फत देण्यात आला आहे.
अनियमित भारनियमनाविरुद्ध केलेल्या आंदोलत पवन मुंडे, मोहन जोशी,अरुण पाठक, नितीन समशेट्टी,सचिन गित्ते, निलेश जाधव,अनिश कुरेशी, गोविंद मुंडे,धनराज कुरील, अच्युत जोगदंड,उमेश निळे, राहुल घोबाळे, आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
[read_also content=”प्रत्येकाला धान्य मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करुन अन्नधान्य पुरवठा करावा : छगन भुजबळ https://www.navarashtra.com/maharashtra/food-should-be-supplied-by-removing-technical-difficulties-for-everyone-to-get-food-grains-chhagan-bhujbal-nrdm-267712.html”]
ऐन सनसुदीच्या काळात,महापुरुषांची जयंती, पवित्र रमजान महिना सुरू असताना होत असलेले अनियमित भारनियमन नागरिकांच्या मनाला न पटणारे आहे. गुडी पाडव्यापासून सुरू केलेले भारनियमन महापुरुषांच्या जयंती दरम्यान ही सुरू असून हा भावना दुखवण्याचा प्रकार महावितरण कंपनी जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चा कडून करण्यात आले हे भारनियमन तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.