मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (Maharashtra Assembly Session Day 1) विधानपरिषदेत माजी राज्यपाल के. शंकरनारायणन, माजी वि.प.स. हरिभाऊ नाईक व माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. मेटेंचे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती यासाठी केलेले कार्य मोठे असल्याचे उपसाभापती निलम गोऱ्हे (Deputy Speaker Neelam Gorhe) यांनी सांगितले.
शिवसंग्राम संघटनेची (Shiv Sangram Sanghatna) स्थापना करून मेटे यांनी शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यासाठी कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारकासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
मराठा समाजाच्या आरक्षणाचे (Maratha Reservation) नेतृत्व करणाऱ्या (Leadership) उमद्या नेत्याचे काही दिवसांपूर्वीच दुःखद निधन झाले, अशा शब्दात डॉ.गोऱ्हे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. के. शंकरनारायणन यांनी महाराष्ट्रासह गोवा, राजस्थान,अरुणाचल प्रदेश, नागालँड व झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली होती. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना होता. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न सोडवण्यास ते आग्रही होते. त्यांनी आपल्या सौजन्यशील स्वभावाने राज्यातील जनतेचे प्रेम संपादन केले होते. के.शंकरनारायणन यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या . तसेच माजी वि.प.स.हरिभाऊ जागोबाजी नाईक यांनी इंडियन नॅशनल टेक्सटाइल वर्कर्स फेडरेशन,राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
[read_also content=”उद्या इस्कॉन साजरी करणार जन्माष्टमी; १८ आणि १९ ऑगस्ट असा दोन दिवस साजरा होणार श्रीकृष्ण जन्मोत्सव https://www.navarashtra.com/lifestyle/iskcon-will-celebrate-janmashtami-tomorrow-shri-krishna-birth-anniversary-will-be-celebrated-for-two-days-on-august-18-and-19-nrvb-317148.html”]
उपसभापती नीलम गोर्हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती धनखड यांचा जीवनपट मांडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या लॅपटॉपवर विधानसभेचे भाषण सुरू झाले. अचानक आवाज वाढल्याने शिंदेंची तारांबळ उडाली. विरोधी पक्षातील सदस्य एकनाथ खडसे, भाई जगताप, अमोल मिटकरी आदी आमदार शिंदे यांना साहाय्य करण्यासाठी धावले. मात्र, प्रयत्न करूनही ‘व्हिडिओ’ बंद होत नव्हता. त्यामुळे संपूर्ण सभागृहात कुजबूज वाढली. हा गोंधळ पाहून उपसभापती नीलम गोर्हे यांनी ‘सभागृहातील सदस्यांना बारीक आवाजाकडे लक्ष न देता मोठ्या आवाजाने बोलत आहे, ते ऐका’, अशी टिपण्णी केली. तोपर्यंत ‘व्हिडिओ’ही बंद झाला आणि शिंदेंनी सुटकेचा निःश्वास सोडला.