वर्धा : गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्ली गावात रस्त्यावर खेळत असलेल्या तिन मुलींवर एका ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार १९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आला आहे. या संबंधी आरोप केशव बावसु वानखेडे वय ५५ वर्ष राहणार माकोना सावरी यास गिरड पोलिसांनी अटक केली आहे.
[read_also content=”बोगस डॉक्टर करीत आहेत रुग्णांच्या जीवाशी खेळ, कोरोनाकाळात संधी साधून अनेकांनी थाटले अवैध रुग्णालय https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/the-bogus-doctors-are-playing-with-the-lives-of-the-patients-taking-advantage-of-the-coronal-period-many-thought-it-was-an-illegal-hospital-nraa-241867.html”]
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी १८ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास सिल्ली गावात एक ७ वर्षीय आणि दोन ६ वर्षीय अशा तीन चिमुकल्या मुली नेहमी प्रमाणे खेळत होत्या. तेव्हा तेथे टिन पिप्याचे काम करण्यासाठी आलेल्या नराधम केशव बावसु वानखेडे यांने या मुलींना पैसे देऊन त्यांना गावातील ओसाड बाथरूममध्ये अंधारात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी यातील एका मुलीने या नराधमापासून आपली सुटका करीत पळ काढला. तर, तिने ही हकीगत आईला सांगितली. यावेळी, या संबंधी गावातील नागरिकांना माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा हा नराधम दोन चिमुकल्यांवर अत्याचार करतांना आढळून आला. यावेळी नागरिकांनी केशव बावसु वानखेडे याला पकडून ठेवून गिरड पोलीसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनिल दहिभाते यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला अटक केली आहे.