वर्धा : वृद्ध महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. रामनगर पोलिसांनी त्या भामट्या तरुणाला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना शहरातील रमाईनगर परिसरातून उजेडात आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
[read_also content=”बनावट दागिने समजून दारूच्या नशेत चोरली ४७.८२ लाखांनी भरलेली बॅग, चोरटे पोलिसांच्या ताब्यात https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/47-82-lakh-bags-full-of-liquor-stolen-from-fake-jewelery-nraa-238061.html”]
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय पीडित महिला १४ फेब्रुवारी रोजी रात्री आपल्या मुलासह घरी होती. रात्री ११ ते १२ च्या दरम्यान पीडितेची नातेवाईक विज्या उर्फ विजय वाघाडे (४०) घरी आला. नंतर, तो पीडितेच्या मुलासोबत बाहेर गेला. थोड्यावेळाने परतल्यावर पीडितेने तिच्या मुलाबद्दल विचारले, असता त्यावर विजयने तो बाहेर बसला असल्याचे सांगितले. त्यानंतर दारूच्या नशेत विजयने पीडितेला टेकडी येथे बळजबरीने ओढत नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पीडितेला धमकी देऊन तेथेच सोडून दिले. त्यानंतर पीडिता कसेतरी तिच्या घरी पोहोचली.
[read_also content=”नागपूर पोलिसांनी शेअर केले एक पुष्पा स्टाईल मिम्स, मिळतेय सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/nagpur-police-shared-a-pushpa-style-mimes-getting-awareness-about-cyber-crime-nraa-239581.html”]
दुस-या दिवशी तब्येत बिघडल्यामुळे पीडितेला सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिने तिच्यावर ओढविलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. त्यानंतर, रामनगर पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी विजय वाघाडे (वय ४०) याला ताब्यात घेतले. जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घृणास्पद कृत्यानंतर नागरिकांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.