हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यातील (Wardha district) हिंगणघाट (Hinganghat) येथील जळीतकांडाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले होते. या प्रकरणाच्या खटल्यात दोन्ही बाजुंचा युक्तिवाद संपल्यानंतर आज न्यायालयाने या प्रकरणात आरोपी विकेश नगराळे (Accused Vikesh Nagrale) दोषी असल्याचं म्हटले आहे. या प्रकरणाचा निकाल न्यायालय उद्या देणार आहे.
[read_also content=”नागपूरतब्बल ८ तासाच्या शस्त्रक्रियेनंतर हृदयातून काढली गाठ, अलीकडच्या काळातील जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी गाठ https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/the-largest-tumor-in-the-history-of-the-world-successfully-removed-from-the-heart-after-8-hours-of-surgery-nraa-234990.html”]
सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटलं, जळीतकांड प्रकरणात न्यायाधीशांनी आरोपी विकेश नगराळे याला दोषी ठरवलं आहे. हत्येचा आरोप त्याच्या विरुद्ध सिद्ध झाले आहे, असे न्यायालयाने म्हटलं आहे. यानंतर सरकारतर्फे मी न्यायालयाला विनंती केली की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जेव्हा एखाद्या आरोपीला खुनाच्या आरोपात दोषी ठरवलं जातं तेव्हा शिक्षा देण्याकरता एक दिवसाची मुदत, शिक्षेबद्दल युक्तिवाद काय आहे, आरोपीचं म्हणणं सादर करण्यासाठी आणि सरकारी पक्षाला देखील कोणती शिक्षा मागावी याबाबत उद्या न्यायालयात आम्ही तक्का जाहीर करु आणि त्यादृष्टीकोनातून न्यायालय उद्या आरोपीला शिक्षा जाहीर करतील.
[read_also content=”पतीच्या विरहात खचून महिलेचे आत्मघाती पाऊल, अंगावर रॉकेल ओतून स्वतःलाच पेटविले https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/woman-commits-suicide-by-pouring-kerosene-on-her-husband-burns-herself-nraa-235044.html”]
काय आहे प्रकरण?
पीडित महिला ही महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यकरत होती. पीडिता ३ फेब्रुवारीला २०२० ला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला पोहचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जातांना आरोपी विकेश नगराळे दबा धरून बसला होता. प्राध्यापिका दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील पेट्रोल काढलेली पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवून टाकले. यात गंभीररीत्या भाजलेल्या पीडितेवर नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १० फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.
[read_also content=”नितीन गडकरी यांचे महाजेनकोच्या प्रबंध निदेशकांना पत्र, कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील प्रदूषणावर व्हावी कारवाई. https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/nitin-gadkaris-letter-to-mahajenkos-managing-director-action-should-be-taken-on-pollution-in-koradi-and-khaparkheda-thermal-power-plants-nraa-234454.html”]
आरोपीविरुद्ध ४२६ पानांचे दोषारोप
या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होती. या प्रकरणात महिला तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या १९ दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले. शिवाय, २८ फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते.
या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. १० फेब्रुवारीला उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शासनाने उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. या प्रकरणात २९ साक्षीदार तपासण्यात आले आहे. घटनेपासून आरोपी विकेश नगराळे कारागृहात आहे.