वर्धा : गर्भपात प्रकरणानंतर डॉ. निरज कदम यांच्या घरातून हरणाचे कातडे जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी वनविभागाने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. मात्र, केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार डॉ. कदम यांनी कातडे असल्याबाबत वनविभागाला २००४ मध्येच पत्र दिल्याची बाब समोर आली असून त्याची प्रत वनविभागाला मिळाल्यानंतर त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
[read_also content=”विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, विमानाने होणार मालवाहतूक https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/great-relief-to-the-farmers-of-vidarbha-freight-will-be-by-air-254310.html”]
९ जानेवारीला एका १३ वर्षीय मुलीचा गर्भपात झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर, तपासादरम्यान कदम हॉस्पिटल आणि राहत्या घरातून गूढ गोष्टी बाहेर येऊ लागल्या होत्या.१५ जानेवारी २०२२ रोजी डॉ. कदम निवास येथून हरणाचे कातडे जप्त करण्यात आले आहे. आर्वीचे वन परिक्षेत्र अधिकारी एन.एस.जाधव दलबलसह घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी हरणाची कातडी ताब्यात घेऊन कदम यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यानंतरही डॉ. कदम यांच्या चौकशीसाठी वनविभागाने त्यांना ताब्यात घेतले नाही. त्यामुळे, कदम कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
[read_also content=”१५५२६० क्रमांक करा डायल, ऑनलाईन गेलेली रक्कम परत मिळवा https://www.navarashtra.com/akola/vidarbha/akola/dial-155260-get-your-money-back-online-nraa-254295.html”]
वन कायद्यानुसार वन्यप्राण्यांची कातडी, नखे किंवा शरीराचा कोणताही भाग घरात ठेवणे गुन्हा आहे. परंतु, २००४ केंद्र सरकारची अधिसूचना आली होती. ज्यात ज्या लोकांकडे वन्यप्राण्यांची कातडी किंवा नखे असल्यास त्यांनी त्वरित वनविभागाला कळवावे. उपरोक्त अधिसूचनेनुसार हरणाच्या कातडीची माहिती डॉ. कदम कुटुंबीयांनी वनविभागाला पत्र देऊन वनविभागाला दिली होती. त्याची प्रत मिळाल्यानंतर विभागाने पुढील तपास सुरू केला आहे.