राज्यभरात सगळीकडे उन्हाळा वाढला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका राज्यातील अनेक तालुक्यांना आणि गावांना बसला आहे. सगळीकडे पाणी टंचाईचे संकट आले आहे. राज्यात सगळीकडे निवडणुकांचे वातावरण आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याने सगळीकडे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नागरिकांना भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. तसेच येणाऱ्या पुढील १० दिवसांमध्ये पाणी टंचाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
उन्हाचा कडाका सगळीकडे मोठ्या प्रमाणवर जाणवत आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागात भूजल पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालल्याने ५१ तालुक्यावर भीषण पाणी संकट आले आहे. त्यामुळे सध्या मराठवाड्यात टँकरने पाणी आणावे लागत आहे. टँकरची संख्या १ हजारच्या पार गेली आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ झाल्याने सगळीकडे पाणी टंचाई जाणवत आहे. मराठवाड्यातील ७६ पैकी ५१ तालुक्यात भूजल पातळीवर त्याचा परिणाम झाला आहे. तर सर्वाधिक भूजल पातळी परभणीमध्ये २.२८ मीटर झाली आहे. परभणीच्या खालोखाल लातूरमध्ये भूजल पातळीमध्ये घट झाली आहे. तसेच ही परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती टँकर?
छत्रपती संभाजीनगर : ४४३
बीड : ११७
जालना : ३२१
लातूर : ८
धाराशिव : ६३
परभणी : १
मराठवाड्यात यंदा कमी पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी जिल्ह्यांमध्ये १ हजार टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील ६३९ गाव आणि १७० वाड्यांना टँकरने पाणीपुवठा केला जात आहे. राज्यामध्ये येत्या काही काळात भीषण पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. तर शहरी भागात पाणीपुरवठा कमी प्रमाणात केला जात आहे.