मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळं सध्या राज्यात बरेच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. दरम्यान, यावर आता राज्यातील उद्योगमंत्री उदय सामंत (Uday samant) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातमध्ये जाणे याचे आम्हाला सुद्धा दु:ख आहे. पण शिवसेनेचा रिफायनरीला (kokan Refinery) विरोध का, असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
[read_also content=”एकनाथ शिंदे हे नाममात्र मुख्यमंत्री, नाना पटोले यांची एकनाथ शिंदेंवर बोचरी टिका https://www.navarashtra.com/maharashtra/cm-eknath-shinde-only-for-name-nana-patole-325784.html”]
दरम्यान, कोकणात राजापूर बारसू परिसरात येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रोजेक्टला जोरदार विरोध होत आहे. मात्र, रिफायनरी प्रकल्प आल्यास संपूर्ण कोकणाचा कायापालट होईल. स्थानिक लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करून काम सुरू करण्यात येईल, असं उदय सामंत म्हणाले. महाराष्ट्रासह कोकणातील बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. मोठ्या प्रकल्पाबाबत मोदींनी आम्ही आश्वासन दिले आहे, वेदांता गेल्याचे आम्हाला ही दु:ख आहे. म्हणून रिफायनरीला विरोध नको तसेच रिफायनरी प्रकल्पाला शिवसेना का विरोध करत आहे, असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला आहे.