What exactly is the reason behind Umesh Kolhe's murder? Posted in support of Nupur Sharma? - Question by Shivrai Kulkarni

हा खून नुपूर शर्मा यांच्या बाजूने समाज माध्यमांवर पोस्ट टाकल्या म्हणून झाला असल्याची जनचर्चा आहे. हे आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत का ? उमेश कोल्हे यांचा मोबाईल सध्या पोलिसांजवळ आहे. त्यांनी नुपूर शर्मा यांना समर्थन देणाऱ्या पोस्ट टाकल्या होत्या का ? त्यांना धमक्या मिळाल्या होत्या का ? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी शोधावी. अशी विनंती शिवराय कुळकर्णी यांनी पोलिसांना केली आहे.

    अमरावती : अमित मेडिकलचे संचालक ( Director of Amit Medical ) उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांचे निर्घृण खून प्रकरण नुपूर शर्मा (Murder case ) वादग्रस्त प्रकरणाशी सबंधित आहे का, याचा काटेकोर तपास करावा, अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते (Maharashtra State Spokesperson ) शिवराय कुळकर्णी (Shivrai Kulkarni) यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह (Police Commissioner Dr. Aarti Singh ) यांना भेटून केली आहे.

    शनिवारी सकाळी शिवराय कुळकर्णी यांनी उमेश कोल्हे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केल्यानंतर शिवराय कुळकर्णी यांनी पोलीस आयुक्तांशी संवाद साधला. उमेश कोल्हे यांचा खून लुटमारीसाठी झाला असल्याचे निदर्शनास येत नाही. आरोपींनी लुटण्यासाठी चाकू मारला असता तर सोबतचे सामान, पैसे घेऊन ते पळाले असते. शिवाय, या खून प्रकरणात पकडलेले आरोपी यापूर्वी कुख्यात म्हणून प्रसिद्ध नाहीत. रुपये लुटण्यासाठी उमेश कोल्हे दिसता क्षणीच मोठा चायनिज चाकू त्यांच्या गळ्यात खुपसण्याऐवजी धाक दाखवून पैसे पळवण्याचा प्रयत्न झाला असता. हा खून नुपूर शर्मा यांच्या बाजूने समाज माध्यमांवर पोस्ट टाकल्या म्हणून झाला असल्याची जनचर्चा आहे.

    हे आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत का ? उमेश कोल्हे यांचा मोबाईल सध्या पोलिसांजवळ आहे. त्यांनी नुपूर शर्मा यांना समर्थन देणाऱ्या पोस्ट ( Post ) टाकल्या होत्या का ? त्यांना धमक्या मिळाल्या होत्या का ? त्यांना या महिनाभरात कोणाकोणाचे व कुठून फोन आले ? ते विशिष्ट समाजाच्या लोकांचे होते का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी शोधावी, अशी विनंती शिवराय कुळकर्णी यांनी पोलिसांना केली आहे. उमेश कोल्हे आणि त्यांना आलेले मेसेजेस, कॉल्स याचा सीडीआर बारकाईने तपासले जावे. अमरावती संवेदनशील होऊ नये, पुन्हा अमरावतीतील सामाजिक सौहार्द खराब होऊ नये. यासाठी पोलिसांनी योग्य व कठोर तपास करून कारवाई करावी, अशी विनंती शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

    हत्येचा तपास एटीएसकडे (ATS)  सोपवावा

    शहरातील ज्या देशभक्तांनी नुपुर शर्माचे स्टेटस ठेवले होते. त्यांना धमक्या येत होत्या. त्यामुळे शहरात संपाताची भावना निर्माण झाली. अशा परिस्थितीत कोल्हे यांची झालेली हत्या संशय निर्माण करीत आहे. शहरात धर्मांध शक्तीच्या वाढलेल्या कारवाया, चिंताजनक आहे. पुढे मागे परिस्थिती चिघळू नये, या करीत उमेश कोल्हे यांच्या हत्येमागील सुत्रधार कोण आहे, हे शोधणे गरजेचे आहे. फेसबुकवर पोस्ट व त्यांना आलेले मोबाईल कॉल तपासणे गरजेचे आहे. त्यामुळे, या हत्येचा तपास एटीएसकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.