Amravati News: कृषी नियंत्रण कक्षाचा 'वॉच'! खरीप हंगाम; बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार रोखणार
अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी तयारीला लागले असून बोगस बियाणे व खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागही सज्ज झाले आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या संकल्पनेतून एक हायटेक ‘कृषी नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. ५ मे पासून सुरू झालेली ही यंत्रणा थेट शेताच्या बांधावरून येणाऱ्या तक्रारींची दखल घेणार असून, बोगस निविष्ठा विकणाऱ्यांवर आणि चढ्या दराने खते विकणाऱ्या केंद्रांवर आता प्रशासनाचा ‘वॉच’ राहणार आहे.(फोटो सौजन्य – istock)
या तक्रार निवारण कक्षासाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून जिल्हास्तरावर भरारी पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाचा खरीप हंगाम तीन आठवड्यांवर आल्याने कृषी विभागासह शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे. यावेळी कृषी निविष्ठा उपलब्धता, बियाणे, रासायनिक खते कीटकनाशके याबाबतच्या तक्रारीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने एक तक्रार निवारण कक्ष सुरू केला व यासाठी ८०८० ५३६६०२ हा डेडीकेटेड क्रमांक दिलेला आहे. यावर शेतकऱ्यांना तक्रार नोंदविता येत असल्याने शेतकऱ्यांची मोठी सुविधा झाली आहे.
आपत्ती व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर एसएओ ६६ राहुल सातपुते यांची ही संकल्पना आहे. या कक्षात १५६ सहायक कृषी अधिकारी व उप कृषी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येऊन दिवस निश्चित करण्यात आले आहे. या क्रमांकावर आलेल्या प्रत्येक तक्रारींची नोंद घेतल्या जाणार आहे. कक्षात नियुक्तीच्या दिनांकास अथवा वेळेत कसूर केल्या कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
Yashomati Thakur : अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी; यशोमती ठाकूर यांचे निवेदन
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा स्तरावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने तीन सदस्यीय जिल्हा स्तर भरारी पथकाचे खर्चे, सचिव जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षण विराग देशमुख यांचा समावेश आहे.66 खरीप हंगामात शेतक-यांना गुणवत्तापूर्व कृषी निविष्ठा मिळाव्यात, त्यांच्या तक्रारींचे त्वरित निरसन व्हावे, यासाठी जिल्हास्तर तक्रार निवारण कक्ष व भरारी पथकाचे गठण केले.






