तुम्हाला भीती वाटण्याचं कारण काय अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यावरुन संजय राऊत भडकले
Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून
“देशाचे निधड्या छातीचे गृहमंत्री,कश्मीरमधून ३७० कलम हटवणारे, मुंबईत शिवसेनेशी दोन हात करू पाहणारे, निवडणूक आयोगाच्या मदतीने शिवसेना फोडून दाखवणारे, सोनम वांगचूक यांना अटक कऱणारे असे आपले गृहमंत्री अमित शाह आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पण त्यांच्या दौऱ्याआधी नगर जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांना अटक केली आहे.त्यांनी कोणत्याही प्रकारे आंदोलन करू नयेत, काळे झेंडे दाखवू नयेत. शिवसेनेचे पदाधिकारी भरत मोरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांना त्यांच्या दौऱ्यापूर्वी अटक केली आहे. अटक करुन त्यांना अज्ञात स्थळी ठेवलं आहे. त्यानंतर मनसे कार्यकर्ते, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनाही नोटीसा बजावल्या आहेत. काहींना अटक केली आहे. कसली भीती वाटते तुम्हाला, तुम्हा सोनम वांगचूक यांची भीती वाटते, मणिपूरच्या महिलांची भीती वाटते. महाराष्ट्रातील शिवसैनिकांची भीती वाटते. तुम्ही देशाचे गृहमत्री आहात, मग तुम्हाला इतकी भीती वाटण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तुम्ही अद्याप मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या नुकसानीची कारवाई कऱण्यासाठी कोणी गेलं नाही, याचीही तुम्हाला भीती आहे. शेतकरी येऊ देणार नाहीत, ते अंगावर येतील,जे आंदोलनाला घाबरतात, अशा भयग्रस्त नेत्यांना राज्य कऱण्याचा अधिकार आहे का, अशा नेत्यांनी राज्यच करू नये, अशा घणाघातही राऊतांनी केला आहे. “मुंबईत मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, या सर्वांच्या गाड्यांसमोर आंदोलने झाली आहेत. हे महाराष्ट्रात होत आलेलं आहे.’ असही संजय राऊत यांनी सांगितलं. पण जेव्हापासून देशावर गुजरात मॉडेल राज्यात आले आहे. त्यांना देशात आंदोलने नको आहेत. त्यांना भीती वाटत आहे. काही कारण नसताना तुम्ही कार्यकर्त्याना अटक करताय, त्यांना स्थानबद्ध करताय, तुम्ही गृहमंत्री असाल, तर निर्भिडपणे लोकांना सामोरे जा, त्यांचे प्रश्न ऐका. हा पळपुटेपणा कशाला करता, महाराष्ट्राचे गृहमंत्रीही तसेच वागत आहेत. फक्त विरोधकांना अटक करणे त्यांना तुरुंगात टाकणे ऐवढचं सुरु आहे.” अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Kantara: Chapter 1: ‘कांतारा’ समोर सगळे चित्रपट फेल, तिसऱ्या दिवशीच १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्याबाबात विचारले असता, संजय राऊत म्हणाले, ” रामदास कदम यांच्यासारखे किरकोळ लोक ज्यांनी बाळासाहेबांच्या जिवावर आयुष्यभर खाल्ल आणि इमले उभे केले, तेच लोक बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना करतात. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे, ते निर्लज्ज आहेत. त्यांची विटंबना करता आणि त्यांचेच फोटो लावता. नारायण राणेंनी त्यांच्या पोरांना आवरावं, तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी, सत्ता येते सत्ता जाते. पण लोक तुम्हाला धुतल्याशिवाय राहणार नाहीत. रामदास कदमां यांच्या पत्नीसंदर्भात अनिल परब यांनी काल जे भाष्य केलं आहे ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या घटनेचीही चौकशी झाली पाहिजे. तुम्ही बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर काय झालं याबद्दल बोलत आहात, तुमची लायकी तरी आहे का, आमच्या अंगावर आलात तर याद राखा,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तसेच, अनिल परबांकडे स्फोटकांचा अजून मोठा साठा पडला आहे. मला माहिती आहे तो काय आहे. तुम्हाला रस्त्यावर तोंड दाखवण मुश्किल होईल. यांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस वाचवणार नाहीयेत. ज्यांनी ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंसर्भात अशी दळभद्री वक्तव्ये केलीत, त्यांना कोणीही वाचवणार नाही. मुळात अमित शाहा आणि नरेंद्र मोदी यांची काय अवस्था होणार आहे, हे आम्हाला माहिती आहे.” असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.






