Who Is Guarding Uddhav Thackerays Matoshree Allegations Of Ambadas Danve
Ambadas Danve Allegations: उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’वर पाळत कोण ठेवतयं…? अंबादास दानवेंचा आरोप
देशद्रोह्यांच्या साथीदारांच्या मांडीला मांडी लावून बसलेले हे लोक हिंदुत्वाचे ठेकेदार असल्याचा दावा करतात. भाजपचे हिंदुत्व हे बेगडी आहे. उद्या दाऊदवर गोमूत्र शिंपडून त्यालाही आपल्यात घेतील
उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री'वर पाळत कोण ठेवतयं...? अंबादास दानवेंचा आरोप
Follow Us:
Follow Us:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
‘मातोश्री’ निवस्थानाबाहेर ड्रोन
उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानावर पाळत ठेवली जातेय
Ambadas Danve Allegations: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावर नजर ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. दानवे यांच्या आरोपांमुळे राजकारणात नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अंबादास दानवे यांनी त्यांच्या ट्विटर एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भात खुलासा केला आहे. “ड्रोन धोरणात मुंबई रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. मग सध्या ‘मातोश्री’ निवस्थानाबाहेर मात्र असे ड्रोन सर्रास दिसायला लागले आहेत. हाय सेक्युरिटी झोन असलेल्या ‘मातोश्री’च्या परिसरात असे ड्रोन दिसणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.” असं अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तसेच, मातोश्रीवर कोणी टेहळणी तर करत नाहीये? “असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
यासोबतच आमदार सुनील राऊत यांनीदेखील या प्रकरणावरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. “सरकारला स्वतःच्या पोलिसांवरच विश्वास राहिला नाही, ही खेदजनक बाब आहे.” तसेच, पोलिस हे सरकारसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. “सरकारला उद्धव ठाकरेंची अजूनही भीती वाटते, त्यामुळे त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे.” दरम्यान, परवानगी घेऊन सर्व्हेक्षणासाठी ड्रोन उडवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
मराठवाडा दौऱ्यात उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाजपवर जोरदार टीका करत, “अमित शहा यांच्या मुलामुळे भारतीय संघ पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळला. देशद्रोह्यांच्या साथीदारांच्या मांडीला मांडी लावून बसलेले हे लोक हिंदुत्वाचे ठेकेदार असल्याचा दावा करतात. भाजपचे हिंदुत्व हे बेगडी आहे. उद्या दाऊदवर गोमूत्र शिंपडून त्यालाही आपल्यात घेतील,” अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली.
आपल्या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सरकारकडून जाहीर केलेली मदत प्रत्यक्षात मिळाली का, याची विचारपूस केली. शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेत त्यांनी सरकारवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला. या दौऱ्याची सांगता शनिवारी (८ नोव्हेंबर) झाली. या वेळी त्यांनी चिकलठाणा येथील गोशाळेत छत्रपती संभाजीनगर आणि जालना लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची बैठक घेतली. त्या वेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
Web Title: Who is guarding uddhav thackerays matoshree allegations of ambadas danve