कास पठार परिसरात प्राण्यांचे हाल (फोटो- टीम नवराष्ट्र)
कास पठार परिसरात प्राण्यांचे हाल
पाणवठ्यांमध्ये पाणीच नाही
कडक उन्हाळ्यात एकही थेंब पाणी मिळेना
कास पठार: जागतिक वारसास्थळ असलेले कासपठार हे सातारा जिल्ह्यात आहे. या कास पठार परिसरातील जंगली तसेच पाळीव प्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसात जंगलात पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून, कास अटाळी कासानी, वांजुळवाडी कास अंधारी रोड तसेच कास पठार परिसरात जवळजवळ 36 कृत्रिम पाणवठे तयार करून वन्य प्राण्यांची तहान भागवण्याचे काम गेली सात आठ वर्षापासून कास पठार समिती तसेच वन विभागाच्या माध्यमातून चालू आहे. परंतु सध्या कास पठाराच्या ऑफिस जवळील एक दोन ठिकाणी फक्त पाणवठ्यावर पाणी असून बाकीच्या पाणवठ्यावर पाण्याचा एकही थेंब नसल्याने वन्य प्राण्यांचे पाण्यावाचून हाल होत आहेत.
वन्य प्राण्यांच्या पाणवट्यावर पाणी टाकण्यासाठी कास पठार समितीने घेतलेला टँकर सध्या कास पठारावर फुलांच्या परिसरात कोर झोनमध्ये जी कामे चालू आहेत त्या कामासाठी वन विभागाच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा करत आहे. याबाबत कास पठारावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ज्या ठिकाणी काम सुरू आहे. त्या ठेकेदाराला पाणीपुरवठा करण्यासाठी तोंडी आदेश दिले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी पाणी पुरवण्याचे काम चालू असल्यामुळे इतर ठिकाणी पाणी टाकण्यात आले नाही असे उत्तर दिले जात आहे.
समुद्राच्या एक लिटर पाण्यापासून किती मीठ तयार केले जाते? वाचून तुम्हीसुद्धा व्हाल आश्चर्यचकित
कास पठार परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलात असंख्य प्राणी असून पाण्याच्या शोधार्थ जंगलातील पाणवठ्यावर येत असतात. परंतु त्या मुक्या प्राण्यांचे पाणी हिरावून ठेकेदारचे हित जोपासणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे हे वागणे संशयास्पद असल्याची चर्चा स्थानिक कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये आहे.
पाण्याची बाटली महागण्याची शक्यता?
इराणमधील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी, ‘ब्रेंट क्रूड’ तेलाच्या किमतीने पुन्हा एकदा १०० डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला. किमतींमधील या वाढीचा परिणाम जगभरातील विविध उद्योगांवर—भारतातील उद्योगांसह—होत आहे; आणि याचे पडसाद आता भारतातील ‘पॅकेज्ड वॉटर’ (बाटलीबंद पाणी) उद्योगामध्येही उमटू लागले आहेत.
कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम; भारतात पाण्याची बाटली महागण्याची शक्यता?
भारतातील बाटलीबंद पाण्याच्या बाजारपेठेचे मूल्य अंदाजे ५ अब्ज डॉलर्स इतके आहे. उन्हाळ्याच्या हंगामाच्या अगदी तोंडावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली ही वाढ, कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, संघर्षामुळे पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या व्यत्ययांमुळे प्लास्टिकच्या बाटल्या, झाकणे (कॅप्स), लेबल्स आणि पुठ्ठ्याचे खोके यांसारखे पॅकेजिंग साहित्य अधिक महाग झाले आहे; या वाढीव खर्चाचा सर्वाधिक फटका लहान प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना बसत आहे.






