मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न (फोटो -ani)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. काही दिवसांपासून ते चांगलेच चर्चेत आले आहेत. काही दिवस आधी त्यांचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या शेजारीं पैशांनी भरलेली बॅग दिसून आली होती. त्यानंतर त्यांच्यावर चांगलीच टीका झाली होती. आता मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास एका मध्यधुंद अवस्थेतील तरूणाने सामाजैक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने शिरसाट यांच्या घरावर दगडफेक केली आहे. तसेच त्याने शिरसाट यांच्या घराबाहेरील परिसरात आरडाओरडा केल्याचे समजते आहे.
शिरसाटांच्या Viral Video ने एकच खळबळ
शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांना इन्कम टॅक्स विभागाने नोटीस धाडली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पैशांची बॅग घेऊन बसल्याचा आरोप केला आहे. आता या आरोपांमुळे आता राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. कारण संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. संजय शिरसाट एका बेडवर बसून फोनवर बोलताना दिसत आहेत. त्यातच त्यांच्या शेजारी पैशांची भरलेली एक बॅग दिसून येत आहे. मात्र आता या व्हिडिओवर आणि संजय राऊत यांच्या आरोपांवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
माध्यमांमध्ये समोर आलेल्या व्हिडिओवर बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले, ‘मी आत्ताच हा व्हिडीओ पहिला. मात्र ते हॉटेल नाही तर, ते माझे घर आहे. मी घरात बसलो आहे. माझ्या घराची ती बेडरूम आहे. या व्हिडिओबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. माझ्या शेजारी माझा लाडका कुत्रा बसला आहे. मला टार्गेट करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहे. एवढी मोठी बॅग पैशांची असेल तर घरातली कपाटे मेली आहेत का? त्यात पैसे नाही तर कपडे असलेली बॅग आहे.