देहूरोड : मावळामधील लार्सन अँण्ड टुब्रो डिफेन्स कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर अन्याय केला जात आहे. मात्र, शिवसेना हा न्याय खपवून घेणार नाही. या कामगारांना न्याय मिळून देणारच. शिवसेना या कामगारांच्या पाठीशी खंभीरपणे उभी आहे. येणाऱ्या काळात स्थानिक भूमिपुत्र कामगार ज्या पद्धतीने पुढील लढा लढतील, त्यात शिवसैनिक मोठ्या ताकतीने त्यांच्यासोबत असतील तसेच सर्व राजकीय पक्षांनी, विविध संघटनांनी एकत्र येऊन या कामगारांच्या लढ्यात सहभागी होऊन न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन युवा सेना जिल्हाअधिकारी अनिकेत घुले यांनी केले,.
तळेगाव दाभाडे जवळील लार्सन अँण्ड टुब्रो डिफेन्स कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कामगारांच्या बेकायदेशीर बदल्यांच्या विरोधात स्थानिक भुमिपुत्र कामगारांनी पुण्यातील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका शिवसेनेचे शिष्टमंडळाने ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, माजी उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, मदन शेडगे, संजय भोईर, अशोक निकम, अक्षय येळवंडे तसेच शिवसैनिक उपस्थित होते. कामगार प्रतिनिधी महेंद्र शिंदे, संदीप गायकवाड, देवा शिरसट, एकनाथ बिनवडे, विजय कदम, अक्षय घुले, आदी पदाधिकारी व कामगारांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.