फोटो सौजन्य - Social Media
काय म्हणाला अभिनेता Ravi Mohan?
अभिनेता Ravi Mohan ने Press Conference घेतली. त्यात त्याने अनेक मुद्दे मांडले. तो म्हणतो की, “माझ्यावर मानसिक दबाव टाकला जात होता. माझ्यावर सायबर छळ केला जात आहे. तसेच माझ्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केला जात आहे.” Ravi म्हणतो की “मला रक्ताच्या उलट्या होत आहेत. Aarthi तसेच तिच्या कुटुंबीयांनी, याआधीही माझ्यावर काळा जादू केला होता.”
यादरम्यान, अभिनेता Ravi Mohan रागामध्ये दिसून आला. त्याचे म्हणणे आहे की विनाकारण त्याला अपमान सहन करावा लागत आहे आणि याला कारणीभूत स्वतः त्याची पत्नी आहे. तो रागात म्हणतो की, ” गेल्या अनेक वर्षांपासून मला गुलामाची वागणूक मिळाली. मी गप्पा राहिलो. पण मी आता गप्प राहणार नाही.” या संपूर्ण पत्रकार परिषदेत Ravi Mohan भावुक दिसून आला.
Ravi ने जाहीर केला मोठा निर्णय
पत्रकार परिषदेत रवीने मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणाला आहे की, “जोपर्यंत मी या त्रासातून मुक्त होत नाही. जो पर्यंत माझा Divorce होत नाही, तोपर्यंत मी अभिनय करणार नाही.” त्याच्या या वक्तव्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. अभिनेता रवी सिनेक्षेत्रातून काही काळ ब्रेक घेणार आहे.






