"कळवते लवकरच...", हातावर मेहंदी अन् हिरवा चुडा; समृद्धी केळकरच्या पोस्टने साऱ्यांचंच वेधलं लक्ष
नववर्षाच्या सुरुवातीलाच अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटीही लग्नबंधनात अडकत आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्याही अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली आहे. रेश्मा शिंदे, हेमल इंगळे, शिवानी सोनार यांच्यानंतर अभिनेत्री समृद्धी केळकरही आता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटोपाहून चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाची चर्चा होत आहे. तिची पोस्टंच खरंतर तिच्या लग्नाच्या चर्चांचे कारण ठरली आहे.
‘फुलाला सुंगध मातीचा’ फेम अभिनेत्री समृद्धी केळकर लवकरच लग्नबंधनात अडकणार माहिती मिळत आहे. तिने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेला फोटो पाहून चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. समृद्धीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातावर मेहेंदी आणि नव्या नवरीसारखा हिरवा चुडा भरल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत समृद्धीने “कळवते लवकरच…” असं कॅप्शन देत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. त्यामुळे समृद्धीचंही ठरलं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. नेमकं काय आहे ? याचा खुलासा अभिनेत्रीने केलेला नाही.
शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून आणि अनेक सेलिब्रिटी मित्रांकडून तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. अक्षया नाईकने लव्हचा इमोजी पोस्ट केला आहे, तर अक्षय केळकर म्हणतो, शेवटी ठरलं तर… आम्ही थांबलो…, पोर्णिमा रेड्डी म्हणते, पण राणी कोण आहे तो ?, मुधगंधा रानडेनेही लव्हचा इमोजी पोस्ट केलाय. ऐश्वर्या शेटे म्हणते, आम्ही तारीख लक्षात ठेवतो असं तिच्या सेलिब्रिटींनी मित्रांनी तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे. तर अनेक चाहत्यांनीही तिच्या ह्या अपकमिंग गुडन्यूजसाठी उत्सुकता दाखवली आहे.
समृद्धीचा हा नवा प्रोजेक्ट आहे की खरंच ती लग्न करतेय, या प्रश्नाचं उत्तर मात्र चाहत्यांना मिळालेलं नाही. दरम्यान, समृद्धी केळकर मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक मराठी मालिकांमध्ये कामंही केलं आहे. ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ मालिकेत ती दिसली होती. तर ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. ‘मी होणार सुपरस्टार’ या शोचं तिने सूत्रसंचालनही केलं होतं.
जुनैद खानचा खुलासा; ‘तारे जमीन पर’ची स्क्रिप्ट वाचताना आमिर खानला मिळाली मुलाच्या आजाराची माहिती!