"त्यावर काम चालू आहे, लवकर बरं व्हायचंय..." तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय ?
तेजस्विनी पंडीत… मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक. दमदार अभिनय आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं स्थान तयार केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ‘येक नंबर’ चित्रपटामुळे चर्चेत होती. हा चित्रपट ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आधारित होता. तिने या चित्रपटाची निर्मिती केली असून तिने स्वत: चित्रपटात अभिनयही केला आहे. अशातच अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सना खान झाली दुसऱ्यांदा आई, व्हिडिओ शेअर करत दिली ‘गोड बातमी’
काही तासांपूर्वीच तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती मला लवकर बरं व्हायचं आहे असं म्हणतेय. लवकरात लवकर होण्यासाठी धडपड करणाऱ्या तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? तिने त्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? जाणून घेऊया…