सना खानच्या फिल्मी करियरबद्दल सांगायचे तर, ती ‘बिग बॉस ९’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या शोमध्ये तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर तिने चित्रपटामध्ये काम करण्याचं ठरवलं. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यानच्या काळात तिचं लव्ह लाइफही बरंच चर्चेत होतं. तिचं २०२० मध्ये आयुष्यंच पूर्णपणे बदललं. तिने धर्मासाठी ग्लॅमर इंडस्ट्री सोडली. जरीही तिने इंडस्ट्री सोडली असली तरीही ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या व्हिडिओंची आणि फोटोंची कायमच सोशल मीडियावर चर्चा होते.