प्राजक्ता माळीने सांगितलं लग्न न करण्यामागचं खरं कारण
Prajakta Mali On Love Life And Marriage Life : कलाकारांची केव्हाच लाईफ ही पर्सनल नसते. कलाकारांच्या लाईफमध्ये नेमकं काय चाललंय ? ही माहिती जाणून घेण्याची प्रत्येक चाहत्याला फार उत्सुकता असते. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींचा चाहतावर्ग फार मोठा आहे. विशेष म्हणजे सध्या आघाडीच्या सेलिब्रिटींमध्ये चाहत्यांची संख्या फार लक्षणीय आहे. मराठी इंडस्ट्रीतल्या लोकप्रिय सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीची कायमच गणना केली जाते. नेहमीच फॅशन, सौंदर्य आणि अभिनयामुळे चर्चेत राहणारी प्राजक्ता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने करियरच्या यशाचं शिखर गाठलं असलं तरीही रियल लाईफमध्ये अजूनही सिंगल का आहे ? या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
प्राजक्ता माळी ३५ वर्षांची असली तरीही ती अजूनही सिंगल आहे ? असा प्रश्न अनेकदा चाहत्यांना पडलेला आहे. तिचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग आहे. तिचे चाहते तिला लग्नाबद्दलचा प्रश्न चाहत्यांना विचारत असते. नुकतंच अभिनेत्रीने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या लव्हलाईफवर भाष्य केलं आहे. त्यासोबतच प्राजक्ताने लग्न न करण्यामागचं कारणही सांगितलं आहे. दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ता म्हणते, “मी प्रेमात पडली आहे. पण मला लग्न आणि कमिटमेंटची भिती वाटतेय. मला नेहमीच लाईफमध्ये एकटं राहायला आवडतं आणि विशेष म्हणजे, मी नेहमीच स्वत:ची कंपनी आणि स्वत:चं लाईफ एन्जॉय करते.”
मुलाखतीमध्ये प्राजक्ता पुढे म्हणाली, “मी २०१३ पासून मुंबईमध्ये एकटी राहतेय. त्यामुळे मला एकट्यात राहण्याची आणि स्वतंत्र्य आयुष्य जगण्याची सवय लागलीये. एक कलाकार म्हणून मी मुक्त आहे. त्यामुळे मला नात्यांच्या बंधनात अडकण्याची भिती वाटतेय. मी प्रेमात पडले होते. पण समोरचा मुलगा माती खातोय असं मला जाणवलं. मी रिलेशनमध्ये २ ते ३ वेळा माघार घेतली आहे.” प्राजक्ता माळी एक उत्तम अभिनेत्री, कवियित्री, सुत्रसंचालिका आणि बिझनेसवुमन अशा वेगवेगळ्या भूमिका लिलया पार पाडताना दिसत आहे. प्राजक्ता ‘फुलवंती’ चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.
हे देखील वाचा- घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान दुबई विमानतळावर अभिषेक-ऐश्वर्या दिसले एकत्र? चाहत्यांनी केला खुलासा!
‘जुळून येती रेशीमगाठी’ टिव्ही सीरीयलमधून प्रकाशझोतात आलेल्या प्राजक्ताने मराठी मालिका, सिनेमा आणि वेबविश्वातही काम केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये सुत्रसंचालनाचीही जबाबदारी तिने सांभाळलीये. शिवाय ‘रानबाजार’ वेबसीरिजमध्ये, ‘जुळून येती रेशीमगाठी’ आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकेंतून, शिवाय ‘खो- खो’, ‘संघर्ष’, ‘हंपी’, ‘पांडू’, ‘चंद्रमुखी’, ‘वाय’, ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’, ‘तीन अडकून सीताराम’ सारख्या अनेक चित्रपटांतून तिने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.






