समंथाची जिद्द पडतेय तिच्या आजारांवर भारी, ठरतेय रुग्णांसाठीही आदर्श; 'या' आजाराने त्रस्त असूनही करतेय वर्कआऊट
साऊथनंतर आता समंथा रुथ प्रभू बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘द फॅमिली मॅन’नंतर आता समंथा ‘सिटाडेल: हनी बनी’साठी चर्चेत आहे. वरुण धवनसोबत सामंथाची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खळबळ माजवत आहे. अभिनेत्री या मालिकेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून यादरम्यान तिने असे वक्तव्य केले की लोकांचे मन अभिनेत्रीने पुन्हा एकदा जिंकले आहे.
समंथा रुथ प्रभूने व्यक्त केली आई होण्याची इच्छा?
समंथा रुथ प्रभूने आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याआधी समंथाने नागा चैतन्यसोबत लग्न केले आणि नंतर दोघांनी घटस्फोट घेतला. आणो दोघेही सहमतीने विभक्त झाले. नागा आता अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न करणार आहे. पण समंथा रुथ प्रभू सध्या सिंगल आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीची आई बनण्याची इच्छा व्यक्त करणे हे थोडे वेगळे वाटत आहे. पण आता जाणून घेऊया याविषयी अभिनेत्री काय म्हणाली आहे.
हे देखील वाचा- बॉबी देओलचा खतरनाक लूक पाहून चाहत्यांचा झाला थरकाप, सूर्याच्या ‘कांगुवा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज!
समंथाचे स्वप्न बदललेले नाही
वास्तविक, समंथा रुथ प्रभू तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेली ‘सिटाडेल: हनी बनी’ सिरीजमध्ये आईच्या भूमिकेत दिसली आहे. अशा परिस्थितीत आता तिने मातृत्वाबद्दल तिला काय वाटते हे उघड केले आहे. समंथा रुथ प्रभूने सांगितले की, तिला खऱ्या आयुष्यातही आई व्हायचे आहे. आयुष्याच्या त्या टप्प्यात स्थिरावण्याचे तिचे स्वप्न अद्याप बदललेले नाही, असे अभिनेत्रीने सांगितले. मुलं होण्यात वय कधीच अडथळा ठरू शकत नाही यावरही सामंथाने भर दिला आहे.
हे देखील वाचा- अभिनेता अनिकेत विश्वासरावची Ex पत्नी स्नेहा चव्हाणने केले दुसरे लग्न, सोशल मीडियावर शेअर केले फोटो!
समंथाला नेहमीच आई व्हायचं होतं
सामंथा रुथ प्रभूने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मला वाटत नाही की आता उशीर झाला आहे. मी अजूनही आई होण्याचे स्वप्न पाहते आणि हो, मला आई व्हायला आवडेल. मला नेहमीच आई व्हायचं होतं, हा एक सुंदर अनुभव आहे. लोक अनेकदा वयाची काळजी करतात, पण मला वाटते की आयुष्यात अशी कोणतीही वेळ नाही जेव्हा तुम्ही आई होऊ शकत नाही.’ चाहत्यांना आता आशा आहे की लवकरच समंथा तिच्या आयुष्यात आणखी एक संधी स्वतःला देईल.