Alia-Ranbir : आलिया भट्ट (Alia bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट केला. त्यानिमित्ताने त्यांनी मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या बांधकामाधीन घराला भेट भेट दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. आलिया मीडियाशी बोलत असताना रणबीर कपूरचे गोड चुंबन घेत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
रणबीर आणि आलिया बांधकामाच्या जागेतून बाहेर पडत असताना हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता. हे जोडपे त्यांच्या ऑफ-ड्युटी लूकमध्ये होते. आलियाने काळ्या पँटसह पांढरा टॉप घातला होता, तर रणबीरने मोनोक्रोम शर्ट आणि पँट घातली होती.
‘रणबीर आणि आलिया त्यांच्या कारमध्ये प्रवेश करताच, पापाराझी फोटोसाठी त्यांच्याकडे आले. काहींनी त्यांना त्यांच्या खास दिवसाबद्दल अभिनंदन केल्याने रणबीरने हात पुढे केला. यादरम्यान आलियाने त्याच्या गालावर एक गोड चुंबन घेतले. काहींनी त्यांना फोटोसाठी विनंती करताचं आलिया गोड हसली आणि लाजल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ‘ हा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स करायला सुरुवात केली. एका यूजरने म्हटले आहे की, “राहासाठी भावंडाचा विचार करताय वाटत”, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे,
“राहा तिच्या आईसारखीच दिसते,”.
आलिया आणि रणबीरचा गेल्या वर्षी काही जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी आपल्या पहिल्या मुलीचे स्वागतही केले. राहा कपूर असं तिचं नाव ठेवण्यात आलं . सध्या, आलिया, रणबीर आणि राहा, वास्तू अपार्टमेंटमध्ये राहात आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा (२०२२) मध्ये आलिया आणि रणबीर शेवटचे दिसले होते. रणबीर आता ‘एनिमलम’ध्ये दिसणार आहे, तर आलिया करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात दिसणार आहे. या जुलै महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे. यात ती रणवीर सिंग, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्यासोबत आहे. नेटफ्लिक्सच्या हार्ट ऑफ स्टोनमधून आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.