फोटो सौजन्य - Social Media
डिसेंबर २०२१ साली सर्वत्र प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने सिनेक्षेत्रात कहरच केला होता. या सिनेमाची गोष्ट, अभिनय, गाणे, एकंदरीत सगळंच हिट होत. पण त्यापेक्षाही हिट झाले ते म्हणजे चित्रपटातील पुष्पराज या पात्राची स्टाईल! पुष्पा या चित्रपटातील पुष्पराज हे पात्र दक्षिण भारतातला सुपरस्टार अल्लू अर्जुनने साकारले होते. फक्त साकारले नाही तर ते जगभरात पोहचवले. चित्रपटाच्या श्रीवल्ली गाण्यातील अल्लूच्या स्टाइलवर पूर्ण जग फिदा झाले होते. अगदी जगाच्या कानाकोपर्यातील लोकांनी त्या स्टाइलवर इंस्टाग्राम रील्स बनवले.
पुष्पा जरी २०२१ साली प्रदर्शित झाला असला तरी गेल्या २ वर्षांपासून अल्लूने त्याचे पुष्पराज पात्र त्याच्या लूकमधून आजपर्यन्त जपून ठेवले होते. पुष्पा चित्रपट भारतात इतका हिट झाला की गेल्या २ वर्षांपासून भारतीय ‘पुष्पा २’ ची वाट पाहत आहेत. दरम्यान, अल्लू अर्जुनच्या लूकमध्ये थोडातरी बदल दिसला तर लोकांना भीती वाटायला लागते. कारण, अल्लू अर्जुन पुष्पा २ च्या शूटमध्ये असतो. त्याच्या लूकमध्ये बदल म्हणजे शूटच्या स्केड्युल मध्ये फरक पडणार. स्केड्युलवर फरक तर चित्रपट लांबणीवर जाणार, त्यामुळे पुष्पाचा क्रेझ मनामध्ये असणाऱ्यांसाठी अल्लू अर्जुनाचा लुक खूप महत्वाचा असतो.
Ee beard tho manage cheyalera??? https://t.co/jekutiqf1C pic.twitter.com/30bkzEqnL4
— Tony (@tonygaaaadu) July 16, 2024
आपला आवडता अभिनेता जेव्हा परदेशात ट्रिपनिम्मित फिरायला जातो तेव्हा त्याचे चाहते मोठ्या उत्साहाने सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. पण अल्लू अर्जुनच्या बाबतीत उलटंच घडले आहे. अल्लू अर्जुन ट्रिप म्ह्णून कतारची राजधानी दोहा येथे गेला आहे. त्याच्या या व्हेकेशन टूरमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. याला कारणीभूत अल्लू अर्जुनचा नवा लुक आहे. पुष्पा चित्रपटापासून अल्लूने ठेवलेला पुष्पराज लुक आता गायब झालेला दिसत आहे. अल्लू अर्जुनची विमानातील विडिओ पाहता, त्यात अल्लूने त्याच्या दाढीला ट्रिम केलेलं दिसत आहे तसे केसही थोडे कमी केले आहेत. याने पुष्पा २ च्या प्रतीक्षेत असणाऱ्या बहुतेक जणांना आता लुक बदलला म्हणजे शूट लांबणीवर जाईल मग चित्रपट यायला वेळ लागेल असे वाटत आहे. पण लोकांच्या या भीतीला दूर करण्यासाठी मेकर्सने ‘पुष्पा २’ ६ डिसेंबरलाच रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे.