अनिल कपूरचे कमालीचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन
अनिल कपूर हा केवळ अभिनयाच्या बाबतीच नाही तर फिटनेसच्या बाबतीतही अनेकांचा आदर्श ठरताना दिसतोय. वयाच्या ६० वर्षानंतरही अनिल कपूरचा कमालीचा फिटनेस पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय. अनिल कपूरच्या प्रभावी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन बद्दल त्याच अनेकदा सहकलाकारांनी प्रशंसा केली आहे. बँडवॅगनमध्ये सहभागी होणारा अलीकडचा सेलिब्रिटी अमेरिकन कॉमेडियन आणि लेखक हसन मिन्हाज याने अलीकडील व्हिडिओमध्ये आपण कोणापासून प्रभावित झालो आहोत, याबाबत मत व्यक्त केले.
काय म्हणाला हसन
हसनने केली स्तुती
हसनच्या म्हणण्याप्रमाणे अनिल कपूरच्या शरीरातील परिवर्तनाने तो किती प्रभावित झाला आहे त्याने अनिल कपूरच्या सोशल मीडिया प्रोफाइलला “थर्स्ट ट्रॅप” असेही म्हटले आहे. तर व्हिडिओच्या शेवटी मिन्हाज सिनेमाच्या आयकॉनच्या फिटनेसबद्दल आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहे. केवळ भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेरही अनिल कपूरचे अनेक चाहते असल्याचे सोशल मीडियावरही दिसून येते.
विकीनेही केली प्रशंसा
अलीकडे प्रमोशनदरम्यान विकी कौशलनेदेखील अनिल कपूरच्या फिटनेसची प्रशंसा केली. अभिनेत्याने त्याच्या आगामी ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील त्याचा अलीकडील लोकप्रिय ट्रॅक ‘तौबा तौबा’देखील या मेगास्टारला समर्पित केला. अनिल कपूरचे फिटनेसबद्दलचे समर्पण त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे स्पष्ट होते, जिथे तो अनेकदा घरामध्ये तसेच घराबाहेर व्यायाम करताना व्हिडिओ शेअर करताना दिसतो.
अनिल कपूरची कामगिरी
अनिल कपूर त्याच्या कामगिरी ने प्रेक्षकांना आपलंसं करतोय. ब्लॉकबस्टर ‘फाइटर’ सह 2024 ला किकस्टार्ट करणारा अभिनेता सध्या ‘बिग बॉस OTT 3’ होस्ट करत आहे. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘सुभेदार’मध्ये तो दिसणार आहे. तो YRF च्या गुप्तचर विश्वाचा एक भाग असल्याचीही अफवा आहे. दरम्यान अनिल कपूरचा फिटनेस हादेखील चर्चेचा विषय ठरतोय.