इशा अंबानी ठरली 'आयकॉन ऑफ द इयर अवॉर्ड'ची मानकरी! स्टाईल स्टेटमेंटने जिंकली सर्वांची मनं
व्यावसायिक जगात अंबानी कुटुंबाचा नेहमीच उल्लेख केला जातो. मुकेश अंबानी यांनी आपल्या मेहनतीने आपले साम्राज्य उभे केले आहे. त्यांची मुलगी ईशा अंबानी देखील इंडस्ट्रीच्या जगात काही कमी नाही. नुकत्याच एका कार्यक्रमात ईशा अंबानीचा गौरव करण्यात आला. ईशा अंबानी ‘आयकॉन ऑफ द इयर अवॉर्ड’ची मानकरी ठरली आहे. तिने आपल्या स्टाईल स्टेटमेंटने सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमात ईशाने शियापारेलीने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता, जो खूपच आकर्षक दिसत होता.
हेदेखील वाचा- सलमान खानने आयुष्यात पहिल्यांदाच ‘लॉरेन्स बिश्नोई’ ग्रहणावर सोडलं मौन, वीकेंड का वारमध्ये दिली प्रतिक्रिया
ईशा अंबानी बिझनेस तसंच स्टाइल स्टेटमेंटमध्ये कुणापेक्षा कमी नाही. तिच्या लूक आणि स्टाईलची सर्वत्र चर्चा असते. बॉलिवूड अभिनेत्री आणि स्टारसोबतच लोक ईशा अंबानीच्या फॅशन सेन्सबद्दलही बोलायला विसरत नाहीत. अलीकडेच, तिला मुंबई येथे आयोजित हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर पुरस्कार 2024 मध्ये प्रतिष्ठित आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – X)
चित्रपट, टेलिव्हिजन, कला, संस्कृती आणि साहित्य जगतील प्रेरणादायी महिलांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य कार्यक्रमात ईशा अंबानीशिवाय बॉलीवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी देखील उपस्थित होती. तसेच अनाया पांडे आणि क्रिती सेनॉन सारख्या स्टार्सनेही या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमात ईशा अंबानीचा गौरव करण्यात आला. तिने स्टेजवर प्रवेश करताच सर्वांचे लक्ष तिच्या आउटफिटवर गेले, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. या खास प्रसंगी ईशाने शियापारेलीने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता, जो खूपच आकर्षक दिसत होता. तिने पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनचा ड्रेस घातला होता, ज्याला सोनेरी रंगाचा टच होता.
हेदेखील वाचा- ‘या’ अभिनेत्रीसोबत होते अक्षय कुमारचे एक्सट्रा मॅरिटल अफेर? रागात पत्नीने सोडले होते घर
तिने तिच्या ड्रेससोबत हलका हेवी मेक-अप आणि कमीच कमी दागिने घातले होते. ईशाने तिचे केस मोकळे ठेवले होते, जे तिला क्लासी आणि ट्रेंडी लुक देत होते. या स्टाईल स्टेटमेंटने ईशाने पुन्हा एकदा सिद्ध केले की तिची फॅशन बी-टाऊन स्टार्समध्येही कुणापेक्षा कमी नाही.
या कार्यक्रमात अनेक स्टार्स उपस्थित होते, त्यापैकीच एक म्हणजे ‘दो पत्ती’ अभिनेत्री क्रिती सेनन. अभिनयासोबतच तिने व्यवसायातही प्रवेश केला आहे. तिचे स्वतःचे ब्लू बटरफ्लाय प्रोडक्शन हाउस आहे. या कार्यक्रमात त्यांनी महिलांच्या व्यवसायातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांविषयी सांगितले. ब्लू बटरफ्लायच्या आधी क्रितीने स्किन केअर ब्रँड हायफन लाँच केला होता.