सलमान खानने आयुष्यात पहिल्यांदाच 'लॉरेन्स बिश्नोई' ग्रहणावर सोडलं मौन, वीकेंड का वारमध्ये दिली प्रतिक्रिया
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान सध्या प्रचंड चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे सलमान चर्चेत आहे. हे प्रकरण प्रचंड जुनं असलं तरी देखील सलमानने अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता सलमानने या ‘लॉरेन्स बिश्नोई’ ग्रहणावर अखेर मौन सोडलं आहे. 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या वीकेंड का वारमध्ये सलमान पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यात घडत असेलल्या गोष्टींबद्दल बोलला.
हेदेखील वाचा- ‘या’ अभिनेत्रीसोबत होते अक्षय कुमारचे एक्सट्रा मॅरिटल अफेर? रागात पत्नीने सोडले होते घर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. या हत्येची संपूर्ण जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली. बाबा सिद्दीकी हे सलमानचे जवळचे मित्र होते. बाबा सिद्दिकींच्या हत्येमुळे सलमान प्रचंड दु:खी होता. या संपूर्ण प्रकरणानंतर देखील सलमान काहीही बोलला नव्हता. मात्र आता सलमान खानने आयुष्यातील या गोंधळावर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. (फोटो सौजन्य- pinterest)
सलमान खानला हिंदी चित्रपटसृष्टीतील सुलतान आणि दबंग खान म्हणून ओळखले जाते. पण सध्या लॉरेन्स बिश्नोई नावाने त्याच्या आयुष्यात ग्रहण लागले आहे. तुरुंगात असलेल्या या टोळीकडून सलमानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याचा जवळचा मित्र आणि राजकारणी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. आता या प्रकरणावर सलमान खानने जाहीरपणे आपले मौन तोडले आहे आणि सांगितले आहे की, सध्या तो त्याच्या आयुष्यातील या कठीण टप्प्याचा सामना करत आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली असून याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये सलमान खानसोबतची जवळीक हे सिद्दीकी यांच्या हत्येचे कारण असल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून सलमानच्या सुरक्षेत बरीच वाढ करण्यात आली असून, त्याला दररोज वेगवेगळ्या माध्यमातून धमक्या येत आहेत. या सर्व प्रकरणांवर सलमान खानने बिग बॉस 18 च्या वीकेंड का वारमध्ये आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
” Yaar, Qasam khuda ki what all I am going through in my life and I have to come and handle this ” #Salmankhan on Weekend ka Vaar “
Professionalism on It’s Peak 🙌@BeingSalmanKhan #Biggboss18 pic.twitter.com/xbwJoieo41
— Just Raj..! (@iBeingRaj_) October 19, 2024
शोमध्ये तो म्हणाला, यार, मी देवाची शपथ घेतो, आजकाल मी माझ्या आयुष्यात ज्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे फक्त मलाच माहित आहे आणि मला आता तुम्हा कंटेस्टेंटना हँडल करायचे आहे. मला आज इथे येण्याची गरज नव्हती. ही माझी बांधिलकी आहे, ज्यामुळे मी आज इथे उभा आहे. हे माझे काम आहे, एवढेच मोठे कारण आहे.
हेदेखील वाचा- ‘मी, पप्पा आणि ओंकार पुन्हा भेटू नव्याने….’; अपूर्वा नेमळेकरची Emotional पोस्ट
काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांना व्हॉट्सॲपवर सलमान खानच्या नावाने 5 कोटी रुपयांच्या खंडणीचा मेसेज आला होता. यानंतर सलमानच्या चाहत्यांची चिंता अधिकच वाढली आहे. बिग बॉस 18 च्या या वीकेंड का वार एपिसोडचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होत आहे.
वादांपासून दूर जात, सलमान खानच्या आगामी सिनेमांची यादी पाहिली तर त्यात पहिलं नाव सिकंदरचं आहे. दिग्दर्शक एआर मुरुगादास आणि निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना सलमानसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ईदला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.