फोटो सौजन्य - Social Media
मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला कला दिग्दर्शक नितीन बोरकर याचे निधन झाले आहे. त्याच्या निराधानाच्या बातमीने संपूर्ण मराठी सिनेसृष्टी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाची बातमी येताच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांवर शोक व्यक्त केले आहे. नितीन हा गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता. अखेर त्याची ही झुंज अयशस्वी ठरली आहे आणि तो काळाच्या पडद्याआड झाला आहे.
रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी, नेरूळचा DY पाटील हॉस्पिटलमध्ये नितीन बोरकरवर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याने जीव सोडला. ब्रेन स्ट्रोकसारख्या जीवघेण्या आजाराने शेवटी नितीन बोरकरला कायमचं हरवलं. त्याच्या जाण्याने सिनेसृष्टीने एक उत्तम कलाकार आणि दिग्दर्शक गमावला आहे.
नितीन बोरकरने अनेक हिंदी तसेच मराठी सिनेमांसाठी काम केले आहे. त्याने सलमान खानचा गाजलेला सिनेमा ‘बॉडीगार्ड’ तसेच इतर सिनेमे ‘द माईटी हार्ट’, ‘आणि काय हवं?’ आणि ‘कदाचित’ सारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये कला दिग्दर्शकाची भूमिका निभावली आहे. प्रसिद्ध मराठी सिनेमा ‘दगडाबाईची चाळ’ तसेच ‘मी वसंतराव’ सारख्या सिनेमांसाठीही त्याने काम केले आहे. चाळीसहून अधिक सिनेमांमध्ये त्याचे योगदान आहे.
अगदी काही दिवसांपूर्वी नितीन याच्या @nitin_borkar01 या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये गूगल पेचा QR कोड शेअर करण्यात आला होता. या पोस्टखाली कॅप्शन नमूद देण्यात आले होते की, “आपला मित्र आर्ट डायरेक्टर नितीन गणपत बोरकर याला काल दिनांक 1 नोव्हेंबर रोजी पक्षाघात – ब्रेन स्ट्रोक चा अटॅक आला असून poona hospital मध्ये त्याचे उपचार चालू आहेत. त्याला पुढील उपचारासाठी आर्थिक सहकार्याची गरज आहे. त्याची प्रकृती सुधारावी, सर्वतोपरी उत्कृष्ट वैद्यकीय मदत त्याला मिळावी म्हणून आपापल्या परीने जमेल ती आर्थिक मदत करावी ही विनंती.सोबत दिलेल्या बँक अकाऊंट, gpay no किंवा QR code वरून आपण ही मदत करू शकता. नितीन आर्ट सोबत ज्या ज्या प्रॉडक्शन्स हाऊसेस काम केले आहे आणि त्यांचे पेमेंट नितीन ला देणं आहे त्यांनीही कृपया जुनी पेमेंट्स क्लिअर करून या नितीनच्या अडचणीच्या काळात सहकार्य करावे, ही कळकळची विनंती.”






