नेहमीचं विविधांगी भुमिका करणारी अभिनेत्री म्हणुन ओळखली जाणारी अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) 2024 वर्षाची धमाकेदार सुरुवात करणार आहे. तिच्या आगामीट (Article 370 Teaser) या चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी प्रदर्शित झाला. यामी गौतम या चित्रपटात अॅक्शन करताना दिसणार आहे. तिच्या सोबत अभिनेता वैभव तत्ववादी (vaibhav tatvavadi) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमणीही (Priyamani) महत्त्वाच्या भुमिकेत आहे. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.
टीझरची सुरुवात काश्मीरमधील भ्रष्टाचार आणि दहशतवादाने होते. यामी रागीट लूकमध्ये दिसते. ती एका गुप्तचर एजंटच्या भूमिकेत आहे जी काश्मीरला विशेष दर्जा असलेले कलम ३७० रद्द करण्याच्या बाजूने आहे. यामी रागाने म्हणते की, काश्मीरमध्ये दहशतवाद हा एक व्यवसाय आहे. याचा स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. ते पैशासाठी आहे. भ्रष्ट नेते आणि अधिकाऱ्यांनी ते कायम ठेवले. ती पुढे म्हणते, जोपर्यंत जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतला जात नाही, तोपर्यंत गुन्हेगारांना काहीही होणार नाही.
टीझरमध्ये लिहिले आहे की, ‘काश्मीर… भारताचा चमकणारा मुकुट… 70 वर्षांपासून जळत आहे… भ्रष्टाचार, दहशतवाद आणि फुटीरतावाद.’ व्हिडिओच्या शेवटी यामी गौतमच्या चेहऱ्यावर रक्त आहे आणि ती कोणाकडे तरी बंदूक दाखवत उभी आहे. पुढे, जम्मू आणि काश्मीरला दिलेला विशेष दर्जा कलम 370, 5 ऑगस्ट 2019 पासून लागू होणार नाही, अशी घोषणा करणारा व्हॉइसओव्हर स्क्रीनवर ऐकू येतो. टीझर शेअर करताना यामीने लिहिले की, ‘एक देश, एक संविधान.’
‘आर्टिकल 370’ मध्ये यामी गौतम, प्रियमणी, वैभव तत्ववादी, अरुण गोविल आणि राज अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांनी केली आहे. त्याचे दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे आहेत. हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.






