 
        
        फायबरयुक्त पेरूचे हिवाळ्यात करा सेवन! सर्दी खोकल्यापासून कायमच दूर राहण्यासाठी 'या' वेळी करा सेवन
देशभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. पण अचानक पडणाऱ्या पावसामुळे आरोग्य बिघडत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आजारपण वाढते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. थंड वातावरणामुळे काहींना सतत सर्दी, खोकला तर साथीच्या आजारांची लागण होते. या आजारांपासून बचाव करण्यासाठी आहारात पेरूचे सेवन करावे. पेरू खाल्ल्यामुळे आरोग्य सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात. आंबट गोड चवीचा पेरू खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पेरूचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. गोडसर, थोडासा तुरट, आतून लाल असलेला पेरु केवळ चवीसाठीच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी वरदान आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात सर्दी खोकल्यापासून दूर राहण्यासाठी कोणत्या वेळी पेरूचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या वेळी पेरूचे खाल्ल्यास कधीच पचनक्रिया बिघडणार नाही आणि सर्दी खोकला होणार नाही.(फोटो सौजन्य – istock)
थंडीच्या दिवसांमध्ये खूप जास्त भूक लागते. भूक लागल्यानंतर तिखट तेलकट कोणत्याही पदार्थांचे सेवन केले जाते. पण यामुळे शरीराची अतिरिक्त वजन वाढणे आणि पोटावर अनावश्यक चरबीचा घेर वाढू लागतो. पोटावर वाढलेला हाच चरबीचा घेर कमी करण्यासाठी नियमित किंवा आठवड्यातून तीनदा पेरूचे सेवन करावे. हिवाळ्यात शरीराला थंडावा देण्याऱ्या पदार्थांचे सेवन करावे. पण चुकीची फळे खाल्यामुळे आरोग्य बिघडते आणि सतत सर्दी, खोकला वाढू लागतो. याच सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पेरू खावा.
कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही फळांचे सेवन केले जाते. कारण बाजारात अनेक वेगवेगळे फळे उपलब्ध असतात. आंबट फळांचे सेवन उपाशी पोटी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे पेरू. पेरूमध्ये विटामिन सी, ए, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला वाढल्यास पेरूचे सेवन करावे. यामुळे सर्दी कमी होते आणि तात्काळ आराम मिळतो. त्यामुळे योग्य वेळी पेरूचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पेरू खाल्ल्यास सर्दी खोकला वाढू शकतो. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी पेरूचे सेवन करावे. यामुळे सर्दी खोकला होत नाही.
साथीच्या आजारांमुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवण्यासाठी पेरूचे सेवन करावे. पेरूमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. याशिवाय पोटाच्या सर्व समस्यांपासून आराम मिळतो. बद्धकोष्ठता, गॅस किंवा अपचन झाल्यानंतर पेरूचे सेवन केल्यास आराम मिळेल. त्वचेवरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी पेरू खावा. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो आणि त्वचा खूप जास्त सुंदर दिसते. पेरुमधील फायबर आणि नैसर्गिक हायड्रेशन शरीरात पाण्याची पातळी संतुलित ठेवते.
हिवाळ्यात सामान्यतः कोणते आजार होतात?
हिवाळ्यात सर्दी, खोकला, कफ, फ्लू, ब्राँकायटिस आणि नोरोव्हायरस यांसारखे आजार सामान्यपणे होतात.
हिवाळ्यात प्रतिकारशक्ती कशी वाढवता येते?
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, तणावाचे व्यवस्थापन करा आणि व्हिटॅमिन सी व झिंक असलेले पदार्थ खा.
हिवाळ्यात पाणी पिणे का महत्त्वाचे आहे?
थंडीत तहान कमी लागत असल्याने पाणी कमी प्यायले जाते. मात्र, शरीरातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.






