मेड इन हेवन : ही भव्य वेब सिरीज बनवण्यासाठीही खूप पैसा खर्च करण्यात आला आहे. त्याच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार, या वेबसीरिजच्या (Web Series) तयारीसाठी 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शोभिता धुलिपाला, जिम सरभ स्टारर या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचीही प्रतीक्षा आहे.

सेक्रेड गेम्स: नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान सारख्या स्टार्सने सजलेल्या सेक्रेड गेम्सचे बजेट ऐकल्यानंतर तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. या वेबसीरिजच्या पहिला सीझन 40 कोटींमध्ये तयार झाला होता, तर दुसरा सीझन 100 कोटींमध्ये तयार झाला होता. ही वेबसीरिज खूप मोठ्या प्रमाणात ओटीटीवर पाहिली गेली. या वेबसीरिजचे चाहतेही अनेक आहेत.

मिर्झापूर2: पूर्वांचलवर आधारित हा क्राईम ड्रामाही खूप लोकप्रिय आहे, ज्याचे 2 सीझन झाले आहेत. Amazon Prime Video ची सर्वात लोकप्रिय वेबसीरिज मिर्झापूर 2 चे बजेट 60 कोटी असल्याचे सांगितले जात आहे, तर पहिल्या सीझनचे बजेट खूपच कमी होते.

द फॅमिली मॅन : मनोज बाजपेयींच्या द फॅमिली मॅनचे दोन सीझन आले आहेत. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, दोन्ही भाग बनवण्यासाठी 50-50 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. म्हणजेच ही वेबसीरिज बनवण्यासाठी खूप पैसा खर्च झाला आहे. पण या वेबसीरिजनेही जबरदस्त कमाई केली आहे.

द एम्पायर: टाईम पीरियड सीरिज द एम्पायरनेही खूप चांगली कमाई केली. दमदार कलाकारांनी सजलेली ही वेबसीरिज जबरदस्त आहे, ज्यामध्ये खूप पैसाही ओतला गेला आहे. या वेबसीरिजचे बजेट 40-50 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.






