बिग बॉसमध्ये होणार डबल एव्हिक्शन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सलमान खान पुन्हा एकदा वीकेंड का वार मध्ये घरातील सदस्यांना रियालिटी चेक देताना दिसणार आहे. दरम्यान, या आठवड्यात कोण बाहेर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शोचा ग्रँड फिनाले फक्त दोन आठवडे दूर आहे आणि एक नाही तर दोन स्पर्धक बाहेर पडतील अशा अफवा पसरल्या आहेत.
शोमधून दोन स्पर्धक बाहेर
बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले अजूनही दोन आठवडे दूर आहे आणि फिनालेच्या फक्त दोन आठवडे आधी, दोन स्पर्धक बाहेर पडतील. ही नावे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे याची घोषणा केलेली नसली तरी, कुनिका सदानंद, मालती चहर आणि तान्या मित्तल मतदानाच्या ट्रेंडमध्ये तळाशी असल्याचे वृत्त आहे. बिग बॉसशी संबंधित अपडेट्स देणाऱ्या अनेक सोशल मीडिया पेजवर ही नावे ट्रेंडिंगमध्ये आहेत. बिग बॉसच्या अनेक न्यूज पेजवर दावा केला जात आहे की या आठवड्यात कुनिका सदानंद बाहेर पडेल. मालती चहरचा शोमधील प्रवासही संपू शकतो.
कुनिका आणि मालतीचा प्रवास संपुष्टात?
बिग बॉस १९ बद्दल अपडेट्स देणाऱ्या पेज द खबरीच्या मते, कुनिका सदानंदचा प्रवास संपला आहे. मालती चहरच्या बाहेर पडण्याच्या अफवादेखील आहेत, कारण ती मतदानाच्या ट्रेंडमध्येही खूप मागे आहे. या बाहेर पडण्यावर सोशल मीडिया वापरकर्ते तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी कुनिकाच्या बाहेर पडण्यावर आनंद व्यक्त केला, तर काहींनी म्हटले की तान्या मित्तल आणि फरहाना भट्टला या आठवड्यात बाहेर काढावे.
अमाल मलिकला सलमानने फटकारले
दुसरीकडे, या वीकेंड का वारमध्ये अमाल मलिकचा क्लास सलमान घेणार आहे. सुपरस्टार सलमान खान अमालला प्रचंड प्रमाणात ओऱडताना प्रोमोमध्येही दिसत आहे आणि असेही म्हणणार आहे की जर तो मागच्या आठवड्यात या जागी असता तर त्याने अमालला शोमधून बाहेर काढले असते.
खरं तर, अमलने गेल्या आठवड्यात गौरवला कर्णधारपदी बढती दिल्याबद्दल बिग बॉसवर टीका केली होती आणि बिग बॉसलाच पक्षपाती म्हटले होते. त्याने असेही म्हटले होते की तो शोमध्ये राहतो की नाही याने त्याला काही फरक पडत नाही. इतकंच नाही वीकेंड का वारदरम्यान, अमाल रोहित शेट्टीशी गैरवर्तन करताना दिसला होता, म्हणूनच आता त्याला सलमान खानच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.






