Redmi A7 Pro: 6000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री... आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, जाणून घ्या किंमत
Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
रेडमी A7 Pro 4G मध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी स्ट्रीमिंग, ब्राउजिंग आणि कॉल्ससाठी दिर्घकाळापर्यंत वापरली जाऊ शकते, अशा प्रकारे डिझाईन करण्यात आली आहे. यासोबतच कंपनीच्या या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 15W चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
रेडमीच्या या नवीन डिव्हाईसमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेट वाली 6.9-इंच IPS LCD स्क्रीनने सुसज्ज आहे. सामान्य बजेटमध्ये उपलब्ध असणाऱ्या स्मार्टफोनच्या तुलनेत हे डिव्हाईस जास्त स्मूद स्क्रॉलिंग ऑफर करतो. एवढंच नाही तर कंपनीच्या या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 12nm आर्किटेक्चरवर बेस्ड Unisoc T7250 प्रोसेसर आहे. यासोबतच फोनमध्ये श्याओमी हाइपरओएस देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देखील देण्यात आले आहे.
रेडमी स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर फोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा AI डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये AI एनहांसमेंट देखील आहे. ज्याचा उद्देश वेगवेगळ्या लाइटिंग कंडीशनमध्ये चांगले फोटो क्लिक करणं असा आहे. डिव्हाईस चार रंगांच्या पर्यायात लाँच करण्यात आले आहे. ज्यामध्ये ब्लॅक, ब्लू, ग्रीन आणि ऑरेंज कलर यांचा समावेश आहे. ऑरेंज व्हेरिअंटमध्ये एक खास लहरदार रियर पॅनल टेक्सचर आहे. हे पॅनल टेक्सचर किंमतीच्या हिशोबाने अतिशय खास आहे.
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये Rp 1,699,000 म्हणजेच सुमारे 9,200 रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे. 7 मार्चपर्यंत कंपनी खास प्री-आर्डर ऑफर देखील देत आहे. या ऑफरमध्ये फोन खरेदी केल्यास ग्राहकांना केवळ Rp 1,499,000 म्हणजेच सुमारे 8,100 रुपये खर्च करावे लागणार आहेत. याचा अर्थ असा की जर तुम्ही फोन प्री-ऑर्डर केला तर तुम्हाला 1,000 रुपयांहून अधिक सूट मिळेल. ही ऑफर शोपी, टोकोपेडिया, टिकटॉक शॉप, ब्लिबली, लाझाडा आणि अकुलाकू सारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, तर फोनची नियमित विक्री 13 मार्चपासून सुरू होईल.






