फोटो सौजन्य - सोशल मीडिया
देशभरात सध्या गणेश चतुर्थीचा सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार देखील गणरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले पाहायला मिळत आहे. तर काही कलाकार गणपतीच्या दर्शनासाठी घराबाहेर पडले आहेत. अभिनेता कार्तिक आर्यनने नुकतेच ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेतले आहे. गाडीतून बाहेर पडताच कार्तिक आर्यन पोलिसांच्या गऱ्हाड्यात आला. अभिनेता दिसताच अनेक पोलिसांनी त्याच्यासोबत सेल्फी काढली. बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना अभिनेत्याला तेथील सुरक्षा रक्षकांनी दर्शनासाठी जाताना चांगलीच अडचण निर्माण केली आहे. दर्शनाला जात असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आज गणेश चतुर्थीनिमित्त पहिल्याच दिवशी अभिनेता कार्तिक आर्यन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला होता. परंतु तो गाडीतून बाहेर येताच गणेशोत्सवाच्या काळात तिथे सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांनी त्याला सेल्फीसाठी घेरलं. त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी अनेक मुंबई पोलिसांनी एकच गर्दी केली होती. इतक्या गर्दीतही अभिनेत्याने सर्वांसोबत अगदी शांत पद्धतीने संवाद साधला. सर्वांचे आभार मानत त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. सध्या कार्तिक आर्यनचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई पोलिसांच्या मदतीने आणि तेथील मंडळाच्या सुरक्षारक्षकांच्या मदतीने कार्तिक लालबागच्या राजापर्यंत पोहोचला. कार्तिक आर्यनने लालबागच्या राजाच्या चरणी डोकं टेकलं आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी कार्तिकने डार्क ब्लू शर्ट आणि ऑफ ग्रे पँट वेअर केली होती. अभिनेत्याचा हा साधा सिंपल अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड भावला असून सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. कार्तिकने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर फॅन्सच्या मनात आपले अढळ स्थान कायम ठेवले आहे.
हे देखील वाचा – शिवानी रांगोळेने गणरायाला घातलं साकडं; म्हणाली, “मुलांच्या आधी पालकांना…”
कार्तिकच्या कामाबद्दल बोलायचे तर, कार्तिक शेवटचा ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तो लवकरच ‘भुल भुल्लैया ३’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तो अभिनेत्री विद्या बालनसोबत चित्रपटाच्या पोस्टरच्या शुटिंगसाठी जाताना दिसला होता. ‘भुल भुल्लैया ३’ येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.