वेगळ्या धाटणीच्या चित्रपटामुळे आणि बिनधास्त बोलण्यामुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा चर्चेत आली आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर कंगनाने रावण दहन केलं. इतिहासात पहिल्यांदाचं हा मान एका महिलेला मिळाला. नेहमी सेलेब्रिटी आणि राजकारण्यांच्या हस्ते रावण दहन करण्यात येतं. यावेळी एका महिलेच्या हस्ते रावण दहन करण्यात आलं.
[read_also content=”दसरा मेळावा ओटोपून परत येणाऱ्या शिवसैनिकांच्या गाडीचा भीषण अपघात, 6 ते 7 जण जखमी! https://www.navarashtra.com/maharashtra/6-to-7-shivsanik-injured-in-accident-near-shahapur-after-returung-from-473710.html”]
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला कंगनाची हजेरी
दिल्लीती ऐतिहासिक लाल किल्ल्यावर दरवर्षी रावण दहन कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमाल मोठे मोठे सेलिब्रिटी, राजकारणी हजेरी लावतात. मागच्या वर्षी अभिनेता प्रभासच्या हस्ते रावण दहन करण्यात आलं होतं. मात्र, यावर्षी हा मान एका अभिनेत्रीला मिळाला. 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका स्त्रीच्या हस्ते रावण दहन करण्यात आलं. कंनाने इन्स्टावर एक व्हिडिए शेअर करत चाहत्यांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिलं आहे,”आज मला दिल्लीच्या प्रसिद्ध लवकुश राम लीलामध्ये रावण दहन करण्याचे सौभाग्य मिळाले. ज्याप्रमाणे श्रीरामांनी रावणाशी युद्ध केले, त्याचप्रमाणे आपल्या देशाचे सैनिक राक्षसांशी लढतात. जय श्री राम,”
या प्रसिद्ध रावण दहन कार्यक्रमासाठी अभिनेत्री कंगना रनौतची निवड करण्यात आली. मात्र, एका महिलेच्या हस्ते रावण दहन करण्याचा निर्णय घेण्याबद्दल लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह या विचारले असता ते म्हणाले की, “गेल्या महिन्यात संसदेने मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकालानंतर समितीने कंगना रणौतच्या हस्ते रावण दहन करण्याचा निर्णय घेतला”.
कंगना राणौतच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच तेजस या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेजस व्यतिरिक्त, कंगना रणौतच्या किटीमध्ये इमर्जन्सी आहे, ज्यामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.