Shalini Pandey Turns Up The Heat In Sizzling Wet White Top Look From Photoshoot
टॉलिवूडमधील ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपट आठवतोय का ? या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत विजय देवरकोंडा आणि शालिनी पांडे होती. विजयने अर्जुन रेड्डीची भूमिका तर, शालिनी पांडेने प्रीती शेट्टीची भूमिका साकारली होती. अगदी साध्या सिंपल अंदाजातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रीती शेट्टीचे काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीही गाजवणाऱ्या अभिनेत्री शालिनी पांडे सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे, तिनं नुकतेच सोशल मीडियावर तिचे सिझलिंग फोटो शेअर केलेत. काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने तिचे हॉट फोटोज् शेअर केलेले आहेत.
इंदूर कपल केसदरम्यान चर्चेत आली Chum Darang, अभिनेत्रीच्या पोस्टने दिला खास संदेश
आता शालिनीचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर कमालीचे ट्रेंड होताना दिसत आहेत. ज्यामध्ये ३१ वर्षीय शालिनी तिचा क्लासी अंदाज चाहत्यांसमोर फ्लॉंट करताना दिसत आहे. तिच्या सिझलिंग अंदाजावर चाहत्यांची नजर भाळली आहे. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये शालिनीने ओल्या टी-शर्टमध्ये कॅमेऱ्यासमोर क्लासी पोज देत दिलेले पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोंमधील तिच्या स्टाईलने आणि अदांनी चाहत्यांचे मन जिंकलं आहे. साउथ चित्रपटांमधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी शालिनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या किलर लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.
यावेळी अभिनेत्रीने सिझलिंग अंदाजातले फोटो शेअर करत ओल्या टी-शर्टमधील फोटोंनी तिने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ओल्या केसांमध्ये अभिनेत्रीचा खूपच आकर्षक लूक पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये तिच्या ख्याती बासूने अतिशय किलर पद्धतीने स्टाईल केली आहे. शालिनीने हा कातिल लूक सिंपल पद्धतीनेच केलेला आहे, फारशी मेहनत घेतलेली नाही. पण, तिने पांढऱ्या रंगाच्या बेसिक टी-शर्टची ज्या पद्धतीने स्टाइल केली आहे, त्याने सर्वांचेच लक्ष वेधले. साध्या गोल नेकलाइन आणि हाफ स्लीव्हज असलेला क्रॉप टॉप पूर्णपणे ओला केला आहे. तो घालून तिने तिच्या फिगरप्रमाणे त्याला परफेक्ट स्टाईल केले आहे.
अभिनेत्रीने पांढऱ्या स्कार्फने तिच्या लूकमध्ये आणखी हॉटनेस वाढवला आहे. तिने त्याला गाठ बांधून आपला संपूर्ण लूक केला. उन्हातही तिच्या आकर्षक स्टाईलने तापमान वाढवले. इतकेच नाही तर तिच्या मादक स्टाईलने लूक आणखीनच किलर झाला आहे. कपड्यांच्या फॅशनच्या बाबतीत शालिनीला कोणीही मागे टाकू शकत नाही. तिने तिच्या हेअरस्टाईलच्या माध्यमातून लूकला दिलेल्या फायनल टचने ग्लॅमरस अंदाज वाढवला. दिशा पटानीचा बिकिनी लूकही तिच्यासमोर फिका आहे.
सोनम कपूरच्या पार्टीत नेमकं झालं तरी काय? बेबोचा उदास चेहरा पाहून चाहते अस्वस्थ, Video Viral
युजर्सना शालिनीचे फोटो इतके आवडलेत की, एका दिवसातच तिच्या फोटोंवर दीड लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. चाहते कमेंट सेक्शनमध्ये तिचं कौतुक करत आहेत. शालिनी पांडेच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, शालिनी शेवटची आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत ‘महाराज’ चित्रपटात दिसली होती. यापूर्वी ती रणवीर सिंहसोबत ‘जयेशभाई जोरदार’मध्ये दिसली होती. यामध्ये ती एका गुजराती मुलीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे. शालिनीला खरी प्रसिद्धी ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटातून मिळाली. ज्यामध्ये ती विजय देवरकोंडासोबत दिसली होती.