२०२० मध्ये रिलीज झालेल्या ‘डॉली, किट्टी और वो चमकते सितारे’ नावाच्या चित्रपटामध्ये कोंकणा सेन शर्मा आणि अमोल पाराशर यांनी एकत्र काम केले. या चित्रपटाच्या शुटिंगपासून दोघांच्याही अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. तेव्हापासून ते आजवर अनेकदा त्यांच्या रिलेशनच्या चर्चा झाल्या आहेत. आता अशातच कोंकणा सेन शर्मा आणि अमोल पाराशर यांच्या रिलेशनच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. सध्या माध्यमांमध्ये हे कपल रिलेशनशिपमध्ये असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. याचं कारण ठरलंय, स्वत: अमोल पाराशरने केलेले विधान…
सोनम कपूरच्या पार्टीत नेमकं झालं तरी काय? बेबोचा उदास चेहरा पाहून चाहते अस्वस्थ, Video Viral
गेल्या काही दिवसांपूर्वीच अमोल पाराशरची ग्राम चिकित्सालय ही वेबसीरीज ‘प्राईम व्हिडिओ’वर रिलीज झाली आहे. या वेबसीरीजच्या स्पेशल स्क्रिनिंगपासूनच या दोघांच्याही रिलेशनची चर्चा सुरु आहे. अमोल पाराशरच्या ‘ग्राम चिकित्सालय’ वेब सीरिजच्या स्क्रिनिंगला कोंकणा सेनने हजेरी लावली होती. तेव्हापासून या दोघांच्याही रिलेशनच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर अद्यापही कोंकणाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, ७ वर्षांनंतर ७ वर्षे मोठ्या कोंकणाला डेट करण्याबाबत अमोलने मौन सोडलं आहे. नुकतंच अमोलने हिंदुस्थान टाईम्सला मुलाखत दिली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती होणार कोणाच्या नावावर? बिग बींनी स्वतःच केला खुलासा
दिलेल्या मुलाखतीत अमोल पाराशरने कोंकणा सेनसोबतच्या डेटिंगवर भाष्य केलं आहे. मुलाखती दरम्यान अभिनेता म्हणाला, “मला कोणीही काहीही विचारले नाही, त्याच्याच आधी प्रत्येकजणाने आपआपले मत बनवून मांडायला सुरुवात केली. पूर्वी मी प्रत्येक बातमीवर प्रतिक्रिया द्यायचो, पण मी आता त्यावर फारसं रिॲक्ट करत नाही. जर तसं काही घडलं आणि मला ते शेअर करावंसं वाटलं तर मी ते स्वतः सोशल मीडियावर शेअर करेन. हे बघा, आपल्या आयुष्यात अनेक लोकं असतात. तुम्ही काही लोकांच्या जवळ असतात तर काहींच्या जवळ नसतात. प्रत्येक नात्याला नाव देणे आवश्यक नाही… तुम्ही आनंदी, शिवाय समोरचीही व्यक्ती आनंदित असते आणि कुटुंबीयही आनंदित असते, एवढेच…”
‘Housefull 5’ ने मागील चार भागांचा मोडला रेकॉर्ड, ४ दिवसांत १०० कोटींचा आकडा केला पार!
अमोलने विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या डेटिंगचाही उल्लेख करताना तो म्हणाला की, “सरदार उधम चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी विक्की कौशल आणि कतरिना कैफ एकमेकांना डेट करत होते. लोकं मला विक्कीच्या रिलेशनशिपबाबत विचारायचे. त्यामुळे मी विक्कीला म्हणायचो की तू तिचा स्वीकार कर. तेव्हा विक्की मला म्हणाला होता की योग्य वेळ आल्यावरच मी तसं करील.”, असंही त्याने सांगितलं. दरम्यान, अमोलने लग्नाबाबतही भाष्य केलं आहे. जर, आमचं लग्न झालं तर त्याबद्दलची माहिती मी सोशल मीडियावर पोस्ट करेन, असंही मुलाखतीदरम्यान सांगितलं.
शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करचा पहिला व्लॉग समोर, नणंद सबा म्हणाली ‘हा काळ खूप कठीण…’
डेटिंगच्या चर्चांबद्दल आणि कोंकणा- त्याच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला की, “पूर्वी तिची आई आमच्या दोघांवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. पण आता नाही टाकत. काहीही घडू शकते. मला स्वतःला आश्चर्यचकित करायला आवडते आणि माझ्या कुटुंबाला ते माहित आहे. जर मी लग्न केले तर मी ते इन्स्टाग्रामवर देखील पोस्ट करेन कारण ते सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. पण सध्या तरी, माझ्याकडे याबद्दल बोलण्यासारखे काही नाही.”
कोंकणा सेन शर्मा आणि अमोल पाराशर यांच्यामध्ये ७ वर्षांचं अंतर आहे. कोंकणा ४५ वर्षांची आहे तर अमोल ३८ वर्षांचा आहे. गेल्या वर्षी अमोलने रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. पण, त्याने गर्लफ्रेंडचं नाव सांगितलं नव्हतं. दरम्यान, कोंकणाने २०१०मध्ये रणवीर शौरीसोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही वर्षांतच म्हणजे २०१५ पासून ते एकमेकांपासून वेगळे राहू लागले. २०२० मध्ये कोंकणा आणि रणवीरने घटस्फोट घेतला. त्यांना १४ वर्षांचा मुलगा असून ज्याचं नाव, हारून शौरी असं आहे.