फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 वाईल्ड कार्ड : आज बिग बॉस 18 चा वीकेंड चा वार आयोजित करण्यात आला आहे. दिवाळीच्या निमित्त बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसाठी अनेक सरप्राईज बिग बॉसने ठेवले आहेत. आज सलमान खान अनेक घरातील सदस्यांना त्यांच्या चुका सांगणार आहे, त्याचबरोबर त्यांना प्रेक्षकांच्या घरामधील स्पर्धकांच्या संदर्भात कशा प्रतिक्रिया आहेत यावर सुद्धा तो बोलणार आहे. त्याचबरोबर अभिनेत्री एलिस कौशिक हिने बिग बॉसच्या घरामध्ये उघडपणे तिच्या बॉयफ्रेंडच्या संदर्भात सांगितले होते. त्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडने दिलेल्या मुलाखतीमध्ये सोशल मीडियावर सध्या एक चर्चा सुरू आहे की तिचा बॉयफ्रेंड खरं बोलत आहे की खोटे बोलत आहे. यावर आता सलमान खान एलिस कौशिकला प्रश्न विचारणारा आहे. यावर अभिनेत्रीचं काय मत आहे आणि ती कोणते निर्णय घेईल याकडे बिग बॉसच्या त्यांचे लक्ष असेल. यामध्ये सर्वात मोठे सरप्राईज म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये आज दोन वाइल्ड कार्ड स्पर्धक घरामध्ये एन्ट्री करणार आहेत.
टीव्हीच्या सर्वात मोठ्या रिॲलिटी शोमध्ये झपाट्याने घरामधील संबंध समीकरण बदलत आहेत. करणवीर मेहरा आणि चुम दरंगची मैत्री वाढताना दिसत आहे. ईशा, अविनाश आणि एलिसच्या मैत्रीपर्यंत घरात बरेच काही घडत आहे जे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रीमियरच्या दिवसापासून वाइल्ड कार्ड एंट्रीची अटकळ होती. अनेक सेलिब्रिटींच्या नावांवर दावे केले जात होते आणि आता अखेर निर्मात्यांनी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून येणारे नाव जाहीर केले आहे. वास्तविक, बिग बॉसच्या घरात एक नाही तर दोन वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहेत. पहिले नाव आहे दिग्विजय सिंह राठी हा स्पर्धक स्प्लिट्सविला 15 नंतर अधिकाधिक लोकप्रिय झाला. ताज्या प्रोमोमध्ये निर्मात्यांनी त्याचा चेहरा दाखवला नसला तरी, त्यांच्या आवडत्या अभिनेत्याची पहिली झलक चाहत्यांना ओळखण्यासाठी पुरेशी होती.
त्याचबरोबर दिग्विजय सिंह राठी यांच्यासोबत स्प्लिट्सविलामध्ये असलेली पार्टनर कशिश कौशिक बिग बॉसच्या घरामधे एंट्री करणार आहे अशी बातमी समोर आली आहे. स्प्लिट्सविलाचा नुकताच समाप्त झालेला सिझन १५ नंतर हे दोघे स्पर्धक बरेच सोशल मीडियावर चर्चेत राहिले होते. यावेळी या दोघे मीडियामध्ये चर्चेचा विषय होते. त्यामुळे आता हे दोन्ही स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये कोणते नवे वादळ घेऊन येतात हे पाहणे मनोरंजक ठरेल.
नव्या वाईल्ड कार्ड सदस्या संदर्भात सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. या दोन स्पर्धकांनी मागील शोमध्ये चांगली कामगिरी केली होती परंतु आता एक्स वर या संदर्भात प्रचंड पोस्ट केल्या जात आहे शेअर केल्या जात आहे. त्यामुळे हे दोन्ही स्पर्धक घरात कशा प्रकारची कामगिरी करतात यावर बिग बॉस प्रेमींची नजर असणार आहे. कोणत्या स्पर्धकांना हे घरात जाणारे सदस्य टार्गेट करणार हे पाहणं मनोरंजक ठरेल