फोटो सौजन्य - JIo Cinema
बिग बॉस १८ : टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस 18 सध्या प्रचंड आहे. सोशल मीडियावर सध्या वाऱ्यासारख्या बिग बॉस 18 च्या संदर्भात अनेक कॉमेंट्स येत आहेत. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरामधील असलेल्या स्पर्धकांचा मित्रपरिवार त्याचबरोबर त्यांचे कुटूंब सुद्धा बाहेरुन त्यांना साथ देताना दिसत आहे. आता स्पर्धकांच्या कुटूंबाच्या अनेक मुलाखती सोशल मीडियावर प्रदर्शित होत आहेत. आज दिवाळीनिमित्त शुक्रवारचा वार बिग बॉसच्या घरात होणार आहे. यासाठी सलमान खान स्वतः बिग बॉसच्या सेटवर असणार आहे. यावेळी आता नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे आणि या प्रोमोमध्ये सलमान खान बिग बॉस 18 ची स्पर्धकच्या वैयक्तिक जीवनावर प्रश्न उपस्थित करताना दिसला आहे. बिग बॉस 18 ची स्पर्धक एलिस कौशिकने तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो घेऊन बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केला होता. यावेळी तिने सगळ्यांसमोरच सांगितले होते की, तिचा बॉयफ्रेंड किती महत्त्वाचा आहे त्याचबरोबर ती त्याच्यासोबत लग्न करणार होती त्याचा खुलासा देखील तिने केला होता. त्यानंतर बाहेर असलेल्या तिचा बॉयफ्रेंडने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की त्याने असे काहीही कबुली केली नाही की ते लग्न करणार नाहीत. यात संदर्भात आता सलमान खानने हा प्रश्न एलिस कौशिकसमोर ठेवला आहे.
सलमान खानने एलिस कौशिकला सांगितले की, एलिस तुम्ही करणवीर मेहराला सांगितले होते की, बाहेर तुम्हाला लग्नसाठी विचारले होते. पण ज्याबद्दल तुम्ही बोलत आहात पण तो मुलाखतींमध्ये वेगळंच काही तरी सांगताना दिसत आहे. यावर एलिस कौशिक सलमान खान म्हणते की अजिबात हे शक्य नाही आहे. याएवर तिला सलमान खान म्हणतो की, त्याने मुलाखतीमध्ये म्हंटल आहे की, मी असं कधीच सांगितलं नाही मी कधीच कोणाला प्रपोज केला नाही एलिस आणि मी नाही आहे. यावर अभिनेत्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
Tomorrow Episode Promo – Salman shows feedback to Rajat Dalal being getting trolled. Alice gets heartbroken. And new wild card entry.pic.twitter.com/RwayRSTcXW
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 31, 2024
बिग बॉस 18 स्पर्धक रजत दलाल सध्या चांगली खेळ खेळत आहे त्याचबरोबर तो कोणत्याही गटाचा भाग नाहीये. बऱ्याचदा तो दोन्ही ग्रुपमध्ये बोलताना दिसतो कधी त्यांच्या साईडने बोलताना दिसत ते कधी दुसऱ्या गटाच्या बाजूने बोलताना त्यामुळे बऱ्याचदा असे होत असते की तो दोन्ही साईडने दोघांच्या नजरांमध्ये चांगला दिसण्याचा प्रयत्न करत आहे. यावरच आता सलमान खान त्याला फटकारताना दिसत आहे की तू एक तर एकाच साईडने राहा किंवा दोघांच्या साईडने बोलणं बंद कर. त्याचबरोबर रजत दललच्या स्वभावावर चाहत्यांनी त्याच्याबद्दल काय टिप्पणी केली आहेत त्या त्याला दाखवण्यात आल्या आहेत.