(फोटो सौजन्य- Xअकाउंट)
चित्रपट निर्माते जोडी दिनेश विजान आणि अमर कौशिक या चित्रपटाला पुढे नेण्यासाठी सज्ज आहेत. हॉरर कॉमेडी ‘स्त्री 2’ हा चित्रपट अवघ्या काही दिवसात चित्रपटगृहात दाखल होणार आहे. सध्या श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या या चित्रपटातील गाणी धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांना या चित्रपटामधील सगळी गाणी प्रचंड आवडली आहेत. आता ‘स्त्री 2’ मधील नवीन गाणं ‘खूबसुरत’ गे देखील चाहत्यांच्या भेटीस आले आहे, तसेच या गाण्याचा टीझर निर्मात्यांनी लाँच केला आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या टीझरमध्ये भेडिया अभिनेता वरुण धवन देखील चमकताना दिसत आहे.
‘स्त्री 2’ च्या नवीन गाण्याचा टीझर झाला रिलीज
गुरुवारी, ‘स्त्री 2’ च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटामधील नवीन गाणं ‘खूबसूरत’ ची पहिली झलक प्रदर्शित केली. ज्याचा टीझर वरुण धवन आणि श्रद्धा कपूर ने स्वतःच्या अधिकृत X हँडलवर शेअर केला आहे. या टीझर व्हिडिओमध्ये वरुण आणि श्रद्धा एकमेकांसह रोमान्स करताना दिसत आहेत. स्त्री 2 च्या गाण्यात भेडिया अभिनेत्याची झलक पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. असे सांगितले जात आहे की, मुंज्याप्रमाणेच स्त्री 2 मध्येही भेडियाचे काही कनेक्शन दिसून येणार आहेत. या ‘खूबसूरत’ गाण्याचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामधील ‘खूबसूरत’ गाण्याला गायक विशाल मिश्राचा आवाज लाभला आहे.
Iss Stree ki khoobsurti ka kaun hai yeh naya aashiq? 🤔🥰 🐺 #Khoobsurat Song Out Tomorrow! #Stree2, the legend returns this Independence Day, 15th August. pic.twitter.com/o5PvQ6IWrW — VarunDhawan (@Varun_dvn) August 8, 2024
15 ऑगस्ट रोजी चित्रपट होणार रिलीज
‘स्त्री 2’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून या चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेटवर नजर टाकली तर राजकुमार रावचा हा चित्रपट 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.