(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
राजकुमार राव स्टारर ‘स्त्री 2’ चित्रपटगृहात दाखल झाला आहे आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हॉरर-कॉमेडीच्या यशात झोकून देणाऱ्या या अभिनेत्याचे चित्रपटातील अस्सल अभिनयासाठी सर्वात अष्टपैलू कलाकार म्हणून त्याची ओळख संपादन केली आहे. प्रेक्षकांव्यतिरिक्त त्याच्या अभिनयाने अलीकडेच प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांचे लक्ष वेधून घेतले ज्यांनी त्याच्या सोशल मीडिया वर पॉवर-पॅक कलाकाराचे कौतुक केले. “सर्व मोठे तारे जेव्हा आरशात पाहतात तेव्हा त्यांना राज कुमार राव यांचा चेहरा दिसतो” अशी पोस्ट लिहीत त्यांनी राजकुमारच कौतुक केले आहे.
All the BIGGEST STARS when they look in the mirror they will see the face of RAJ KUMAR RAO 😳😳😳
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 16, 2024
राजकुमार रावने ‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर आणि मिसेस माही’ सोबत बॅक टू बॅक हिट्स चित्रपट देऊन 2024 ची जोरदार सुरुवात जोरदार केली. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री 2’ च्या महत्त्वपूर्ण यशानंतर राजकुमार रावने नक्कीच ब्लॉकबस्टर्सची हॅट्रिक मारली आहे. अमर कौशिक दिग्दर्शित हॉरर कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 54.35 कोटींच्या कमाई नंतर हा चित्रपट 2024 मधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. स्त्री 2 सगळे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडणार अस देखील म्हटले जात आहे.
हे देखील वाचा- स्त्री २ च्या चित्रपटावर पैशांचा पाऊस! दोन दिवसात केला १०० कोटींचा टप्पा पार
‘स्त्री 2’ चित्रपट चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे चालत असताना राजकुमार राव त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या रिलीजसाठी तयारी करत आहे. ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मध्ये अभिनेता तृप्ती दिमरीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय, अभिनेत्याकडे आणखी काही आगामी प्रकल्प आहेत ज्यांची घोषणा या वर्षाच्या अखेरीस करणार आहे. असे नवनवीन चित्रपट घेईन अभिनेता चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी देणार आहे.