(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
राधिका मदन सध्या खूप खुश आहे. अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयानंतर ती आता ‘साहिबा’ गाण्यात तिच्या अभिनयाने मन जिंकत आहे. या गाण्यात ती साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसत असून या दोघांची जोडी खूप पसंत केली जात आहे. जसलीन रॉयल आणि स्टेबिन बेन यांनी गायलेल्या या गाण्याने सर्व चार्टवर धुमाकूळ घातला आहे. राधिकाचा डान्स ही या गाण्याची खासियत बनली आहे.
आज राधिकाने तिच्या सोशल मीडियावर एक गोड चिठ्ठी लिहिली आणि ‘साहिबा’साठी तिने किती मेहनत घेतली हे शेअर केले. अभिनेत्रीने लिहिले की, “मी ‘साहिबा’साठी कोणत्याही चित्रपटाप्रमाणे तयारी केली आहे. मी माझी व्यक्तिरेखा पारखली, नेपथ्य आणि प्रत्येक छोट्या गोष्टींवर काम केले आहे. गाणे संगीतमय होते, परंतु आमच्या संपूर्ण टीमने ते एका वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाप्रमाणे सादर केले आहे. जसलीन रॉयलच्या गाण्याने आम्हा सर्वांना प्रेरणा दिली’. असे अभिनेत्रीनं सांगितले.
अभिनेत्री राधिका मदनसंबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लीक करा.
गाण्याबद्दल मत मांडताना अभिनेत्री म्हणाली, ‘गाण्यात काम करण्यासाठी कथ्थक माझ्यासाठी सर्वात कठीण होते. मी याआधी कथ्थक कधीच केले नव्हते आणि ते सुरवातीपासून शिकावे लागले. कमी वेळ आणि मोठ्या अपेक्षांदरम्यान मी हे काम पूर्ण केले. आता या गाण्याला आणि आम्हाला खूप प्रेम मिळत असल्याने, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी माझे गुरू राजेंद्र चतुर्वेदी आणि सुदीप सर यांचे आभार मानते. ‘साहिबा’ माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि कायम राहील. इतके प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.’ असे अभिनेत्रीने सांगितले.
गाण्यातील राधिकाच्या फर्स्ट लूकपासून ते तिच्या अभिनय आणि डान्सपर्यंत सर्व काही शानदार आहे. अभिनेत्रीची मेहनत आणि समर्पण प्रत्येक दृश्यात दिसून येते. आपल्या सुंदर शैलीने आणि आकर्षक नृत्याने राधिकाने हे गाणे संस्मरणीय बनवले आहे. सध्या राधिका सुधांशू सायराच्या ‘सना’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘साहिबा’ या चित्रपटातून राधिका मदनने पुन्हा एकदा तिची अष्टपैलुत्व आणि प्रतिभा सिद्ध केली आहे. चाहते आता त्याच्या पुढील चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. आगामी प्रोजेक्ट्समध्ये राधिका ‘रुमी की शराफत’ या कॉमेडी चित्रपटात आणि मॅडॉक फिल्म्ससोबतचा तिचा पाचवा सहयोग आणि सुधांशू सैरिया दिग्दर्शित ‘सना’ चित्रपटामध्ये दिसणार आहे.